वॅलेंटाईन वॅलेंटाईन!!
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे.
"वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं. स्वीटीच्या मागल्या बर्थ डे च्या दिवशी तिल्या दिलेल्या ग्रीटींग कार्डावर तिला मराठीत शुभेच्छा लिहिताना अक्षरांच्या स्वरूपात कोंबड्यांच्या पायाला शाई लाऊन त्या अक्षरशः कागदावर नाचवल्या होत्या. गर्ल ने अगम्य लिपी वाचून अन त्यावर कानापर्यंत खोटं हासून मला "आय लव यु" म्हणत कडकडून मिठी मारलेली मला लख्ख आठवतेय (हे सांगताना माझ्या सावळ्या गालावर लाली चढलीय. ती दिसत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे). त्यामुळे ती मला पुन्हा माझ्या स्वाक्षरीत कागदावर लिहायला लावील ह्याची शक्यता अक्षय खन्नाच्या टकल्यावर केस उगतील इतकी कमी होती. त्यामुळे मराठी सॉफ्टवेयर अनईन्स्टॉल केल्यावर वॅलेंटाईनच्या कचाट्यातून मी तसा सुटलो होतो.
पण दुसऱ्या दिवशी कॅडबरीला हे कळल्यावर ती मला हटाने म्हणाली, "हे काय रे विनू. कर ना पुन्हा इन्स्टॉल!". त्यासाठी तिने मला गालावर दोन मुकेही दिले होते. (लाजून पाणी झालोय. आता ते आमच्या नळाला का येत नाही हा सद्ध्या आमचा प्रश्न आहे). त्या दोन पाप्यांच्या बदल्यात मी पुरता फसलो होतो. आज लाडू लवकर घरी येणार होती. तोवर मल लेख संपवायचा होता. पण पुढच्या तीन ओळी सोडून टेपा मारता येत नाहीत. आठवून आठवून बेजार झालोय. त्यातूनच उत्पन्न होणारे हे पर्सनल विचार. भावनांचा उद्वेग म्हणणे अधिक संयुक्तिक होईल.
हे बघा प्रेमाचा एक कॅलेण्डर दिवस आहे. १४ फेब्रुवारी. त्याला म्हणतात वॅलेण्टाईन डे. इ.स. २००० साली जेव्हा गणू आजोबांना मी वॅलेंटाईनची व्याख्या सांगितली तेव्हा ते वॅलेंटाईन ऎवजी टर्पेंटाईन दिवस समजून कवळीवजा हसले होते. मी ही त्या पी.जे वर हसलो. कारण गणू आजोबांची नात म्हणजे माझी पप्पी अन तिचे आई वडीलही तेव्हा हसत होते.
खरं तर इ.स. २००० पूर्वी वॅलेंटाईनडे ला भीक घालणाऱ्यांपैकी मी नव्हतोच. पण तेव्हाच्या कॉलेज फेस्टिवल मध्ये ही ब्युटी क्वीन झाली. मी तिला २२ गुलाबं पाठवली होती. एकूण २३ गुलाबं मिळून ही ब्युटी क्वीन झाली होती. त्या २२ गुलाबांसाठी मित्रांकडून घेतलेली देणी इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षापर्यंत सुटली नव्हती. त्याच मित्रांनी दिलेल्या शिव्याशापांचा हा परिणाम असावा. आज मी वॅलेंटाईनविषयी खोटंनाटं लिहितोय. अहो कीबोर्डमधून शब्द फुटत नाहीत!
ह्याच शोचनीय अवस्थेत मला फ्लॅशबॅक दिसतो तो २००० सालच्या पहिल्या वॅलेंटाईनचा. आता पहिला वॅलेंटाईन डे म्हणजे तिच्यासाठी तिचा बर्थडेच जणू. शिवाय ६ जून. तिचा खरा बर्थडे. ५ जूनचा मॉक बर्थडे. त्याव्यतिरिक्त २० सप्टेंबरही. हा माझा बर्थडे. पण ह्याही दिवशी पैसे माझ्याच खिश्यातून सांडायचे म्हणून हाही जणू तिचाच बर्थडे. "दिवाळी" किंवा "दिवाळे" ह्याला एक सुसंगत शब्द म्हणजे "माझ्या स्विटीपायचा बर्थडे".
बरं तर मी सांगत होतो, माझ्या पहिल्या वॅलेंटाईनडे ची कथा. इसविसन १४ फेब्रुवारी २०००. बांद्रा-गेईटीच्या रणांगणावर विनितभाऊ एकटे उभे ठाकले होते. माझ्या स्ट्रॉबेरीला ‘कुछ कुछ होता है’ बघायचा होता. अन मी मात्र जॅकी चानचा ‘शांघाय नाईट्स’ बघितला असता तर! ह्या स्वप्नात कानाशी घोंघावणाऱ्या माशा हाकलत गेटशी उभा होतो. खिशातल्या २०० रूपयांची सांगड आजच्या दिवशी कशी घालता येईल ह्यासाठी मी आदली रात्र प्लानिंग करत जागवली होती. त्यासाठी मी मोठ्या भावाचे एम.बी.ए.चे आपत्ती व्यवस्थापनाचे म्हणजे सोप्या भाषेत डिसॅस्टर मॅनेजमेण्टचे नोट्स वाचत आराखडे बांधले होते. पुढच्या अर्थशास्त्रीय नोबेल पारितोषकासाठी मी तोच रूपीज २०० वर्सेस वॅलेंटाईनडे हा शोधनिबंध प्रस्तुत करणार आहे. त्यासाठी लागणारे ५ वर्षांचे वॅलेंटाईनडेजचे जमाखर्च मी स्टॅटिस्टिकल डेटा म्हणून जमवून ठेवले आहेत.
गुलबक्षी आल्यावर मी जॅकी चानला चीनीत ‘शेशे’ करून "कुछ कुछ होता है!" म्हणजे एस्जॅटली काय होतंय हे पहायला थिएटर मध्ये घुसलो. आता का घुसलो हा प्रश्न मला विचारू नका. ओव्हरॅक्टींग चे क्लासेस चालवणारा हिरो, म्हशीपेक्षा जाड अन सावळी हिरोईन, नातीच्या वयाचे चाळे करणारी आजी अन आजीच्या वयाची ऍक्टींग करणारी नात पाहून मला शॉर्ट स्कर्ट मधली टीना मेली तेव्हा ह्या चित्रपटात राम नाही म्हणून खूप रडू कोसळलेलं. त्या माझ्या रडण्याला ही आजही एक फिल्मी इमोशनल मोमेण्ट मानून चालतेय. तिला अजूनही वाटते की "कुछ कुछ होता" माझा आवडता पिक्चर असावा. पण एक मात्र मानायला हवं, तिचा हा ग्रह झाल्यानेच मी प्रेमाची पुढची पायरी चढू शकलो. शिवाय चित्रपट ५० रूपयात आटोपला. तोवर टॅक्स फ्री झाला होता न तो. (डिसॅस्टर मॅनेजमेण्ट रॉक्स!!!)
एका अतिसामान्य मुंबईकराप्रमाणे बांद्राला फिरायला आल्यावर बॅण्डस्टॅण्डला येऊन कॉफी पिऊन काशीयात्रेचे समाधान घेऊन जाणे ह्याला मीही काही अपवाद नव्हतो. मग पिक्चर संपल्यावर उत्साहाच्या भरात रिक्षा पकडली आणि डिसॅस्टर मॅनेजमेण्टचा पुरता फज्जा उडाला. ३५ रुपये रिक्षाने चापले. आता ११५ रुपयात बॅण्डस्टॅण्डची कॉफी आणि आर्चिजचं गिफ्ट असा प्रोग्रॅम आटपायचा होता. पण नियतीने पुन्हा कच खाल्ली आणि बॅण्डस्टॅण्डवर नेहेमीच्या शंभू कॉफी हाऊस च्या ठिकाणी नवीन बरिस्ता उघडलेले होते. ते बघून रसमलाईला मोह आवरेना. तिच्या हटटापाई मग मी आढेवेढे घेत आत गेलो अन प्रेमात आकंठ बुडाल्याची ऍक्टींग करत खिशातल्या १०० च्या नोटेला गोंजारत एका टेबलावर बसलो. चॉकोलेट लाटटेच्या नावावर स्वार होऊन ११० रूपयाचं बील आलं आणि प्रेम अन पैसा ह्या रणसंग्रामात मी धारातीर्थी पडलो. मला वीरगती प्राप्त झाल्यासारखे वाटत होते.
बरिस्ताने मला बिरस्ता करून सोडले होते. समुद्राच्या काठाने चालताना भोवती दिसणारे राहुल अंजली आधीच एकमेकांना आय लव्ह यु बोलून युद्ध जिंकल्याचे मला दिसत होते. ती शेवट्ची मोक्याची लढाई मला जिंकायची होती. मी घरातल्या कुंडीतला एक गुलाब कापून तो उजवीकडच्या खिशात लपवलेलं. (माझे २० रूपये वाचले होते. डिसॅस्टर मॅनेजमेण्ट रॉक्स अगेन!!!!) मी ते काढून अन ‘आय लव्ह यु’ म्हणून तिच्या हवाली केलं. तिनं मग त्याच गुलाबासारखं हसून दाखवलं अन मला किस्स केलं. मी बससाठी उरलेले ५ रुपये विसरलो होतो!
भानावर येईस्तोवर सूर्य समुद्रात अन बॅण्डस्टॅण्डची जोडपी झुडुपात वा बागेत पांगली होती. माझ्या मेकॅनिक्सच्या सात अस्यान्मेण्ट्स लिहायच्या बाकी होत्या. त्या लिहिणे प्रेमा इतकेच गरजेचे होते. त्यामुळे अजून थांबणे शक्य नव्हते. मग तिनंही माझा निरोप घेतला अन ती बांद्राला तिच्या मावशीकडे निघून गेली. मी बांद्रा ते मालाड मासिक ट्रेन पास व नंतर २४३ नंबरच्या बस ने ४ रुपयात प्रवास करून १ रुपया वाचवला होता. मला आपत्ती व्यवस्थापन जमलं होतं.
तर असा गेला माझा पहिला वॅलेंटाईन डे. नंतरचेही तसेच गेले. वॅलेंटाईनडेचा स्पेशल पाल्य भत्ता २०० रुपयांवर कधी गेला नाही. नोकरी लागल्यावरही आज माझी अवकात ५०० रुपयांवर नाही हे नमूद करावे.
फ्रेण्ड्स ५०० रूपयात वॅलेंटाईनडे परवडला पण मी वॅलेंटाईनवर लिखाण करावे असा जाचक विचार हिच्या मनात आला कुठून असेल? मी ह्यातली पाळेमुळे शोधत असतो तोच दारावर बेल वाजते! पप्पी आली असेल, पण अजून लिखाण पूर्ण नाहीये! काय करावे? मी बिचकत बिचकत दार उघडतो....
... ही माझीच बेब असते. क्युट स्माईल देत. "हाय हनी", असं म्हणून मी तिला बिलगतो अन तोच लाईट जाते.... "ओह नो! मी वॅलेंटाईनवरचा लेख लिहित होतो. तो सेव्ह केला नव्हता!!"..... अशा मोक्याच्या क्षणाचा फायदा मी ऊठवला नसता तर माझ्या सारखा लुख्खा कुणी नसेल.... (आय ऍम सो विक्केड!)... ती मला बघून मधाळ आवाजात वॅलेंटाईनडे गिफ्ट मागते.... मी तिला माझ्या उजव्या खिशातलं गुलाब काढून देतो अन अनवधानाने म्हणतो, "अर्चिजमधला गुलाब आहे हो. घरातला नाही" ... ती उपहसाने म्हणते, "माहितीये मला! पहिल्या वॅलेंटाईनडेचे तुझे प्रताप!".... पण हे हिला कसं माहित की तो गुलाब घरचा होता?... मी माझ्याच विचारांत गुंततो अन ती पुन्हा गुलाबासारखं हसून दाखवते अन मला किस्स करून कवेत घेते....
..... तिनं मला अजूनही कवेत घेतलेय. मी मात्र अगदी मोक्याच्या क्षणी वीज गायब केल्याबद्दल रीलायन्स एनर्जीला वॅलेंटाईनडे गिफ्ट म्हणून कुंडीतला गुलाब पाठवायचा विचार करतोय.....

The End
Sunday, 25 October 2009
माझी कथा.... करण
तारूण्याची पहिली पायरी म्हणजे पौगंड! तेरा ते एकोणीस अशी ही सात वर्षं आपल्या आयुष्यातली सर्वात धाडसी अन स्वप्नवत. केवळ ब्लॅक व्हाईटच नाही, तर ग्रे विचारांची माणसं जाणण्याची ही सुरूवात. पहिल्या प्रेमाची हाक, पहिल्या चुंबनाची साद. आयुष्याची कठोर कटू सत्यं जाणून घ्यायची निकड. ती पचवायची धडपड. मनातल्या बऱ्या वाईट द्वंद्वाला "आय एम कूल!" म्हणवून घालण्यात येणारी एक निष्फळ फुंकर!
करणही ह्याच द्वद्वांत कुठेतरी फसलेला. पण शेवटी फिनिक्स सारखं राखेतून भरारी घेत आकाशी उडणाऱ्याला कोण थोपवतो? करणची ही गोष्ट वाचत "हा फिनिक्सही कदाचित टीनेजर असावा" असे वाटून जाते, ते उगीच नाही......
भाग एक:
"आखों मे तुम्हें बसालूं कभी", टी.व्ही.वर मेनकाचं गाणं चालू होतं. निळा हिरवा समुद्र अन त्याच्या किनाऱ्यावरची ती पांढरी वाळू. त्याच समुद्राच्या पाण्यात भिजलेला कमावते शरीर असलेला देखणा सुपरस्टार अनुज आणि ओलीचिंब कमनिय मेनका ह्यांचं हे मादक गाणं आजच्या घडीचं सुपरहीट गाणं होतं. कित्येक टिनेजर आणि तरूणांना मोहिनी घातलेल्या ह्या जोडीने त्यांच्या नव्या "प्यार का साथ" चित्रपटाने सफलेतेचे रेकॉर्ड्स तोडले होते. कित्येक तरूण मुली आज अनुजच्या प्रेमात अन कित्येक युवक मेनका च्या मादकतेत रंगून गेले होते.
करणही ह्याच टिनेज युवकांतला एक.
गाणं संपलं तरी करणने पडद्यावरून आपली चमकदार नजर हलवली नव्हती. तो मेनकाच्या चिंतनात उसासे टाकत, उजवा गाल तळहातावर टाकून बसला होता. मागून समीरने त्याला डोक्यावर टपली मारली.
"आऊच्च!", करण किंचाळला, "दॅट हर्ट्स!"
"मेनका!", समीरने हृदय पकडल्याचं नाटक केलं, "माय डार्लिंग! मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझी ४० वर्षांची म्हातारी! कवळी लाऊन सुरेख हसतेस!!!"
"दादा! गप्प बस्स हा!", करण चवताळला, "४० नाही, ३९! आणि तुलाच म्हातारी वाटते ती. परवा टीन सेन्सेशन अलिशिया म्हणाली की तिला मेनका सारखं व्हायंचय. सगळे तुझ्यासारखे नसतात. ३३ ऍण्ड स्टील सिंगल! लूक ऍट यु!" करणने जुना सूर छेडला.
"सिंगल! हह! माझ्या तर कित्येक गर्लफ्रेण्ड्स होत्या. तुझ्या वयाचा होतो तेव्हा तिघींना पटवलेलं मी... आणि बाय द वे, तुला किती गर्लफ्रेण्ड्स आहेत रे? " समीरने करणचा दुखती नस दाबली, "ओह! येस! एक आहे ना; पूजा प्रधान! राईट?"
करणने डोळे वटारले...
समीरला आणखीच आवेश चढला....
"प..प्प, पूजा!.... प..प्प..प्रोजेक्टचं विचारायचं होतं.... प...प्प...पप्पी देशील का?", समीरने करणचा पाय खेचला. करणच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र सॅवियो तोंड दाबून हसत होता. करणचं मुलींशी होणारं संभाषण त्याच्या मित्रमंडळीत आधीच थट़्टेचा विषय झालं होतं.
"काय सॅवियो! मी बरोबर म्हणतोय ना?", समीरने सॅवियोलाही मस्करीत सामिल करून घेतले.
"तो कशाला हो म्हणेल तुला? तो माझा मित्र आहे.", करणने सॅवियोकडे बघितलं, सॅवियो आधीच हसत हसत लोळू लागला होता

"यू बोथ आर इमंपॉसिबल!", करण रागावला अन तणतणत त्याच्या खोलीत निघून गेला.
आईने पलिकडून समीरला नेहेमीची "वयानुसार वाग!" अशी मुळूमुळू ताकिद दिली. पण सहा महिन्यांसाठी नेव्हीतून घरी आलेला समीर, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा, अशी करणची थट़्टा करणं कशी सोडेल? शेवटी लहान भाऊ असतातच कशाला?
काही वेळ गेला. करण अजूनही त्याच्या बिछान्यावरच बसून रागाने धुमसत होता. तसा इतरांनी त्याची थट़्टा करणं त्याला गैर वाटत नव्हतं पण मेनकाला ‘म्हातारी’ म्हणवून समीर दादाने पुन्हा लाईन क्रॉस केली होती. मेनका करणची ड्रीमगल. करण लहान होता तेव्हाच मेनका फिल्मस्टार म्हणून नावारूपास आली. तेव्हापासूनच करण हातातले खेळणे सोडून, टिव्ही वर मेनकाची गाणी, इण्टरव्ह्यू, चित्रपट लागले की ते तल्लिनतेने बघायचा. का कुणास ठाऊक? पण तिचा चेहेरा बघताना एक वेगळाच आनंद वाटायचा त्याला. ती जाणिव अश्लील नव्हती. उलट एक आपुलकी होती, कौतुक होतं. दोन वर्षांपूर्वी तिच्या "रूमानी बदन" ह्या चित्रपटावर अश्लिलतेचा आरोप करणाऱ्या काही संस्थांच्या सभासदांनी थिएटरवर केलेल्या दगडफेकीत करणही जखमी झालेला. तरी त्याने रक्तबंबाळ अवस्थेत दुसऱ्या थियेटर मध्ये जाऊन तो चित्रपट पूर्ण पाहिला. त्यामुळे मेनकाला त्याच्या हृदयात लहानपणासून हळवा कोपरा लाभला होता. म्हणतात ना पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. तसलंच ते. फक्त फरक एवढा की मेनका करणचं पहिलं, मधलं अन कदाचित शेवटचं प्रेमही होतं!
घरी समीरनंतर १८ वर्षांनी उगवलेलं हे शेंडेफळ आणि त्याची सोंगं घरातल्यांनी तळाहातावरच्या फोडासारखी जपली नसती तर नवलंच. करण लहान असतानाच, अगदी एक दोन वर्षाचा असेल, त्याचे अन समीरचे बाबा हार्ट अटॅकने वारले. बिझिनेसमध्ये बराच तोटा झाला होता. मलबार हिलचे मोठे घर विकून तेव्हापासूनच समीर, त्याची आई अन छोटा करण हे "रूपवते कुटुंब" उपनगरात राहू लागलं. आईने बॅंकेत मॅनेजर म्हणून नोकरी धरली, म्हणूनच समीरचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकलं. करण कडून त्यांना जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. करणला आयआयटीत जायच होतं. तसं करण अभ्यासात हुशार. त्यामुळे ती चिंता नव्हती. समीरने नेहेमी वडिलधारा थोरला भाऊ म्हणून करणचा नीट सांभाळ केला होता. बाबा सोडून गेल्यावर १८ वर्षांच्या समीरने, अशा कठीण परिस्थितीत, आईला जमेल तेवढी मदत करून मोठा मुलगा म्हणून आपलं कर्तव्य नीट बजावलं होतं. म्हणूनच एवढी वर्षं समीरने लग्नही केलं नव्हतं.
तसंही नेव्ही वाल्यांचं कौटुंबिक आयुष्य यथातथाच. सहा महिने घरी, सहा महिने डॉकवर. कुठली मुलगी अशा परिस्थितीत समीरला सांगून आली असती. तरीही, दिसण्यात ह्रितिक रोशनश्टाईल, समीर अजून अविवहित कसा हे आजूबाजूच्या लोकांना न सुटणारं कोडं होतं. आईनेही शेवटी कंटाळून नियतीसमोर हात टेकले होते. धाकट्या करणला नेव्हीत इंटरेस्ट नव्हता हे तिचं नशीब!
"मोठा भाऊ आहे म्हणून काय झालं. मीही त्याच्या सरांना, ल्युटिनिण्ट देशपांडेना, "चकण्या" म्हणतो तेव्हा कित्ती चिडतो तो! जर त्याला थट़्टा सहन होत नाही तर मी का सहन करावी?", करण त्याच्या कोंदट खोलीत बसून मनातल्या मनात स्वतःची बाजू मांडत होता.
तोच दारावर ठकठक झाली. समीर आणि सॅवियो आत आले.
"सॉररी ब्रो!", समीर करणच्या खांद्यावर हात टाकून बसला आणि त्याने त्याचा खांदा आपुलकीने दाबला.
"फरगेट इट यार!", सॅवियोने नेहेमीचे तीन शब्द म्हटले.
करण काहीच बोलला नाही. दोन मिनिटं शांततेत गेली. तिघे खोली न्याहळत बसले होते. तसं खोलीत बेड, टेबललँप, अभ्यासाची पुस्तकं आणि कॉंप्युटर सोडून एकच गोष्ट ठळक होती. अन ती म्हणजे भिंतींवर चिकटवलेले मेनकाचे मोठ्ठाले पोस्टर्स. डोळे बंद करूनही "सुकलेल्या फेविकॉलचा वास म्हणजे करणची खोली" असं सहज सांगता येत असे.
"चकण्या ...ल्युटिनिण्ट कमांडर ....देशपांडे.", करण हळूच म्हणाला
समीर सुरूवातीस थोडा गुरगुरला पण करणच्या बालिश डोळ्यांत बघून मग शांत चित्ताने पुटपुटला "ओके! चकण्या ‘सडू’ ल्युटिनिण्ट कमांडर देशपांडे! खूष?"
करणने हसून दाखवलं. पण प्रकरण इथवरंच संपलं नाही.
(म्हणजे संध्याकाळी पिझ्झा पार्टी करायची शिक्षा समीरला ठोठवण्यात आली. अन समीरने ती आनंदात पूर्णही केली.)
भाग दोन:
"काय चाल्लेय?", सॅवियोने करणला विचारलं. गेली बराच वेळ करण कॉंप्युटरवर बसून काहीतरी करत होता.
"माझी मेनका-द-ड्रिमगल.कॉम साईट अपडेट करतोय. परवा तिच्या आगामी चित्रपटाचे ‘इधर उधर’चे फोटोज मिळाले ते अपलोड करतोय. हे बघ!"
सॅवियो तिचे फोटो बघायला, भुकेला सिंह ज्या उत्साहाने कोऱ्या गवताकडे बघेल, तेवढ्या उत्साहात पुढे सरसावला. सॅवियोला मेनकात बिलकुल रस नव्हता. समीरदादा सांगतो तशी त्याला ती थोडी थोराडच वाटायची. भरपूर मेक-अप करून अन फोटो इफ्फेक्ट्स वापरून वय कमी करणे हे काही अशक्य नव्हते. पण हे सगळं करणच्या समोर बोलून दाखवण्याइतका तो काही मूर्ख नव्हता.
"छान आहे!", सॅवियो फोटोतली दूसरी हिरोईन मालविका कडे बघून म्हणाला. करणने कॉंम्प्युटरवर सॅवियोच्यासमोर उत्तान मालविकाला फोटोतून खोडलं अन मेनकाची इमेज साईटवर अपलोड केली.
"परवा बॉलीवूडब्लॉग्स वर गेलेलो, तिकडे मेनकाचा फॅन क्लब आहे. तिथे मला आज सेप्शल गेस्ट म्हणून ऑनलाईन चॅटवर बोलावलंय. मी इतर नवशिक्या मेनका फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे." करण दिमाखात म्हणाला.
"अरे पण सायन्स होमवर्क! सोलंकी मिस पट़्ट्या मारते रे होमवर्क नसेल तर!"
"माझा झालाय!"
"अरे मग इतका वेळ सांगितलं का नाहीस?"
"तू विचारलंस का?"
"तुझा होमवर्क झाला ह्याचं काय मला स्वप्न पडणार होतं? ठिक आहे. दे मग टेक्स्ट बुक. मी छापतो."
"नाहिये!"
"का? कुठे आहे?"
"एका मित्राला दिलीय."
"कुणाला?"
"आहे एक वर्गातला मित्र."
"कोण विनोद? हेतन? दानिश शाह? "
"नाही! वेगळंच कुणीतरी!"
सॅवियो गोंधळला पण थोड्या वेळातच काहीतरी समजल्यागत डोळे मिचकावत म्हणाला, "मित्र? हं? की मैत्रीण! प्प.प्प...पूजा प्रधान ना? काय?"
करण ओशाळला. त्याच्या गोऱ्या गालावर लाली चढली.
"कधी आलेली? काय बोलली? सांगना!"
"दुपारी आलेली. काही विशेष नाही. सायन्स होमवर्क केला का म्हणून विचारत होती. मी दिला!"
"काय दिलं? आणखी काय म्हणाली?", सॅवियो उत्साहात होता.
"मी दिला, सायन्स, मॅथ्स आणि मराठीचा होमवर्क! म्हणाली थॅन्क्स. रात्री परत देईन म्हणून."
"ले बिड्डू!! म्हणजे रात्री पुन्हा गुटर्गू आहे! काश मै भी मेरा होमवर्क टाईमपे करता तो मेरे भी घर लडकियां आतीं और कहतीं..."
"भैया!", करणने सॅवियोची जन्नत-ट्रीप तोडली, "होमवर्क बाकी है भैया!"
सॅवियो त्रागा करत उठला, दरवाज्याशी जाऊन, "उद्या भेटूया! रात्री काय काय झालं ते सांग तेव्हा!" असं म्हणून निघून गेला.
सॅवियो नाहीये तर करणला पुढचे काही तास शांतता मिळणार होती. समीर अजून ऑफिस मधून आला नव्हता. सुट़्टीवर आला असताना समीरदादा, मनोहर मामांना कामात मदत करायला म्हणून त्यांच्या ऑफिसात जाई. "मोहिते फायनान्स कन्सल्टण्ट" चे हेड "मनोहर मोहिते" हे आईचे चुलते. आता समीर नाहीये म्हणजे घरी शांतता होणारच होती. तिकडे आई किचनमध्ये बिझी.
करणने बॉलीवूडब्लॉग्स.कॉम वर लॉगिन केलं. "क्रेझीकरन"(!) ह्या नावाने प्रोफाईल बनवला. पाच दहा मेनका फॅन्स आधीच लॉगिन झाले होते. ग्रुप चॅट सुरू झाला.
ऍडमिनिस्ट्रेटर: वेल्कम टू द बिग्गेस्ट मेनका फॅन एव्हर! करन! ही इज अवर क्रेझीकरन!!!
क्रेझीकरन: हाय फ्रेण्ड्स!
वैशाली२००२: हाय क्रेझीकरन. तू मेनकाचा फॅन कधीपासून झालास?
क्रेझीकरन: लहान असल्यापासून. आई म्हणते की मी एक दोन वर्षांचा असेन तेव्हापासूनच तिचे पोस्टर बघून बोट दाखवायचो. गाण्यांवर डांस करायचो. टि.व्ही. वर तिचे पिक्चर लागले की तीन तीन तास टि.व्ही.समोर बसून रहायचो. हलायचो नाही.
वैशाली२००२: हाऊ नाईस!!
कूल-आनंद: मेनकाचे काय फिचर्स तुला आवडतात?
क्रेझीकरन: सगळेच. तिचे डोळे, ओठ, आवाज. तिचा केस फिरवण्याचा अंदाज. डांस, ऍक्टींग सगळच!
कूल-आनंद: बूब्स, बट़्ट?
क्रेझीकरन: हाहा! बी सिरियस! त्यापेक्षाही बरंच काही चांगलं आहे तिच्याकडे
गुजरातीज-रॉक: शी इज गुजराती ना?
क्रेझीकरन: हो! तिच्या आईकडून. तिचे बाबा मराठी आहेत.
गुजरातीज-रॉक: म्हणजे हाफ-गुजराती? ओह नो!
वैशाली२००२: पण मी एकलं की तिचे बाबा नंतर त्यांना सोडून गेले म्हणे!
क्रेझीकरन: हो खरंय ते! तिथूनच तर तिने स्वतः घराचा भार उचलला. सुरूवातीचे फ्लॉप चित्रपट तिने पैसा मिळावा यासाठीच केले.
फझ्झीफ़ातिमा: हो तिचा तो पहिला पिक्चर लवबर्ड्स! फ्लॉप!
क्रेझीकरन: अगं असं नको बोलूस! त्यातला तो आत्महत्येचा सीन आठवतोय? त्या परफॉर्मन्स मध्ये कित्ती परिपक्वता होती.
केशवकमल: मला तर तिचा पहिला हीट "ममता" आठवतो!
क्रेझीकरन: येस इंडिड! त्यात आपल्या बाळाला सोडून युद्धावर जाणारी आई कित्ती छान रंगवली आहे तिने. असं वाटत होतं की ती त्या बाळाची खरी आई असावी.
फझ्झीफ़ातिमा: पण त्यानंतर तिने एवढे सशक्त रोल्स केले नाहीत, ग्लॅमरसच राहिली.
क्रेझीकरन: तू तिचा तमिळ "कालक्षणम" विसरलीस. कॅन्सरग्रस्त मुलीची व्यक्तिरेखा कित्ती छान केली तिने. लोकं तर त्या चित्रपटाला तमिळमधला "आनंद" म्हणत होती.
फझ्झीफ़ातिमा: दॅट्स ट्रू!
ब्लॅकवल्चर: पण तिच्या खाजगी आयुष्याविषयी तुला किती माहित आहे?
क्रेझीकरन: मला नीट कळलं नाही?
ब्लॅकवल्चर: तिच्या खाजगीतल्या गोष्टी. म्हणजे तू तिला तिचा फॅन म्हणवतोस. तुला तिची काही गुपितं माहित असतीलच!
क्रेझीकरन: गुपितं! म्हणजे काय विचारायचे ते नीट विचार.
ब्लॅकवल्चर: ओके. मग तिचा पहिला चित्रपट कुठला?
गुजरातीज-रॉक: सगळ्यांना महितीये. लव्ह्बर्ड्स!
क्रेझीकरन: नाही. एक मिनिट. तिचा पहिला चित्रपट आहे "तूफान". पण तो लव्हबर्ड्सच्या नंतर रिलीज झाला.
ब्लॅकवल्चर: छान! आता सांग तिचं शिक्षण किती अन कुठे झालं?
क्रेझीकरन: बडोद्यात. न्यू नरसी स्कूल शाळा, सेण्ट पायस कॉलेज. बी.ए.
ब्लॅकवल्चर: उत्तम! तिचा पहिलं अफेयर?
क्रेझीकरन: अनुज कुमारच! "ममता" पासून!
ब्लॅकवल्चर: नाही, म्हणजे फिल्मी बिझिनेस च्या बाहेर!
क्रेझीकरन: असं ऎकलं आहे की तिचा तिच्या कॉलेजात बॉयफ्रेन्ड होता.
ब्लॅकवल्चर: हो, गौतम दोशी! तो आता अमेरीकेत एका मल्टीनॅशनल फार्मस्युटीकल कंपनीचा हेड आहे.
क्रेझीकरन: ग्रेट! तुला त्याचं नावही माहितीये?
ब्लॅकवल्चर: तिच्या वयाच्या २३ वर्षापर्यंत तो तिच्या सोबत होता. नंतर सोडून गेला.
क्रेझीकरन: ओके. दॅट्स सॅड!
ब्लॅकवल्चर: का सोडून गेला माहितीये?
क्रेझीकरन: नाही. का?
ब्लॅकवल्चर: तिचं दुसऱ्याशी अफेयर होतं! ती प्रेगनण्ट राहिली होती त्या दुसऱ्याकडून!
करण चमकला...
क्रेझीकरन: व्हॉट रब्बीश!!!
ब्लॅकवल्चर: एवढंच नाही तर तिनं अबॉर्शन न करवता ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं.
करण अस्वस्थ झाला. हे नवीनच होतं.
क्रेझीकरन: आय डोण्ट बिलीव्ह धिस? एनी प्रूफ!
ब्लॅकवल्चर: प्रूफ! अरे हाडामासाचा तिचा मुलगा असताना प्रूफ कशाला पाहिजे? मीच आहे तो! तिचा टाकलेला मुलगा. चांडाळणीने मला वाळीत टाकून दिले. दॅट स्लटी बिच्च!!!
करणचे हात थरथरू लागले. हे अनपेक्षित होतं. काय करावे हे न सुचल्याने करणने ताबडतोब स्पॅमर दाबला अन ब्लॅकवल्चरला ब्लॉक केले. त्याचं डोकं भणाणत होतं. काही वेळ तो असाच तो मॉनिटरकडे पाहत होता. त्याच्या सगळ्या संवेदना मंद पडल्या होत्या. चॅट रूममधले इतर फॅन्स ब्लॅकवल्चर ला शिव्या घालत होते. पण आधीच करणने ब्लॉक केल्याने ब्लॅकवल्चर निपचित होता
थोड्यावेळातच ऍडमिनिस्ट्रेटरने त्याला चॅटरूम बाहेर हाकलले. तो लॉग आऊट झाला.
त्याच्या नावापुढचा कर्सर आता नुसतीच उघडझाप करीत होता.
"हाऊ डेयर ही!", करण रागाने शहारला होता, "मेनकाच्या खाजगी आयुष्यावर कसा कुणी असा गलिच्छ आरोप करू शकतो? नक्कीच हा कुणीतरी माथेफिरू आहे...", त्याचं मन सांगत होतं, "पण त्याला तिच्या जुन्या बॉयफ्रेण्डच नाव गाव माहित होतं!", एक दुसरा विचार बोलू लागला, "खरंच जर त्याला हे माहित असेल तर....?"
नसत्या शंकानी त्याच्या मनात कल्लोळ माजवला होता. त्याचं दैवत लांच्छनी लागलं होतं. रागात त्याच्या मुठी आवळत होत्या.
रागाच्या भरात त्याला दारवरची टकटकही ऎकू आली नव्हती.
"हाय!", नेहेमीचा परिचित आवाज पुन्हा ऎकू आला, "मी आत येऊ का?".
करणने धीर धरला अन स्वतःला सावरून तो म्हणाला, "या प्लीज कम ईन!"
दार हललं अन एक प्रसन्न चेहेरा आत शिरला, पूजा प्रधानचा.
"थॅन्क्स! तुझा होमवर्क चांगला होता! बरीच मदत झाली.", पूजा करणला त्याच्या वह्या सोपवत म्हणाली. करण पेक्षा थोडी बुटकी पण फिकट निळ्या सलवार अन जीन्स मध्ये जणू एखादी बाहुलीच वाटावी. तांबटभोर केस. गोल गोरा चेहेरा. पिंगट डोळे अन गुलाबी ओठ. चेहेऱ्यावर नेहेमीची प्रसन्नता. आवाजात नेहेमीचा गोडवा. स्वभावात नेहेमीची शालीनता.
करणसारख्याला पूजा प्रधान सारखी मुलगी भाव देते ह्याचं करणच्या मित्रमंडळींना उगीच अप्रूप वाटत नव्हतं.
"थॅन्क्स!", करण उभा राहत म्हणाला, "आय मिन वेलकम... ऍण्ड थॅन्क्स टू!"
पूजा थोडक्यात हसली. "मी निघते!", पूजा म्हणाली अन जायला वळली.
"का?" ऎवजी "ओके!" असा करणच्या तोंडून शब्द पडला. करण आणखी शब्दांची जमवाजमव करणार तोच पूजा मागे वळली. बोलायच्या आवेशातलं करणचं तोंड दोन मिनिटं उघडंच राहिलं...
"वन अपॉन साईन हा कोसाईन असतो. तुझ्या दहाव्या गणितात कोसेक लिहिलास तू. ते चुकलंय म्हणजे. नंतर करेक्ट कर!", पूजा म्हणाली.
तिच्या पिंगट डोळ्यांत पाहत करण गुंगच झाला. गणिताच्या गोष्टीही तिच्या तोंडून गोड वाटत होत्या.
"ओके वेलकम! (की ‘थॅन्क्स’!?)", गोंधळून करणने म्हटले. अजूनही सही शब्दांची जुळवाजुळव होत नव्हती. मेंदूचा तोंडाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. करणचा मेंदू, त्याचे पूजाला पाहणारे डॊळे अन तिला ऎकणारे कान, हेच सांभाळण्यात जास्त बिझी असावा!
"बाय. गुड नाईट!", तिनं मधाळ आवाजात निरोप दिला.
"बाय!" करणने हात हलवला, "हॅव स्वीट ड्रीम्स!"...
अचानक आपण तिला "स्वीट ड्रीम्स!" म्हटल्याचे जाणवून करण लाजला. आज पहिल्यांदाच करणने तीन शब्दांचं वाक्य व्याकरणासहीत तिच्याशी नीट म्हटलं होतं.
तिनेही त्यावर हसून दाद दिली अन रातराणीच्या फुलांच्या सुगंधासारखी ती करणच्या संवेदना दरवळून निघून गेली.
हा सुगंध समीर येईपर्यंत दरवळत होता....
*******************
भाग तीन:
"आई गं!", सॅवियो पाठ अन तळहात चोळत म्हणाला; सोलंकी मिसने होमवर्क न केल्याने दहा पट्ट्या मारून, त्याला इतर २ मुलांच्या सोबत ओणवे उभे केले होते. १५ मिनिटांची ती शिक्षा भोगून तो करणच्या बाजूस परत येऊन बसला होता.
"तरी मी तुला होमवर्क कर म्हणून बोल्लो होतो!", करणने कालची संध्याकाळ त्याला आठवून दिली, "उगीच पट्टी खायची हौस तुला!"
"हौस कसली?", सॅवियो कपाळावर आठ्या आणून म्हणाला, "घरी गेलो आणि मॅथ्स होमवर्क सुरू केला मी. आय स्वेअर! पण तोच टि.व्ही.वर विम्बल्डन फायनल सुरू. अरे फेडरर आणि नदाल कोण सोडणार यार?"
"अरे पण होमवर्क इम्पॉर्टण्ट की टेनिस?", करणने फळ्यावरचं लक्ष न ढळू देता सॅवियोला हळूच विचारलं.
"ऑफकोर्स टेनिस!" सॅवियोने स्वाभविक उत्तर दिले, "फेडरर आणि नदालनं कधी मॅथ्स होमवर्क केला होता?"
"पण त्यांच्या शाळेत सोलंकी मिस नव्हती!...", करण त्रासला.
"...मि. रूपवते! स्टॅण्ड अप!", सोलंकी मिसने चश्मा रागात डोळ्यांवरून काढला. वर्गात भीतीचे हुंकार फुटले. सगळे वळून करणच्या बाकाकडे "आता ह्यांची लागली!" अशा मोठ्या डोळ्यांनी पाहू लागले. सोलंकी मिसने डोळ्यावरचा चश्मा काढणे ही वर्गातल्या मुलांसाठी वाईट बातमी असायची.
"इज युवर डिस्कशन विथ मि. रूडॉल्फ मोअर इम्पॉर्टण्ट दॅन माय लेक्चर? ईफ सो? देन प्लीज शेयर इट विथ द क्लास!"
"सॉरी मिस!", करण अडखळत उभा राहिला.
"व्हॉट सॉरी? मि. सॅवियो रूडॉल्फ हॅस ऑलरेडी हॅड हीज पनीशमेण्ट! नाऊ डू यू वॉण्ट टू फॉल फोर इट?"
"नो मॅम! सॉरी मॅम!", करणने मान खाली घातली.
"लूक करण! यू आर अ व्हेरी गुड स्टुडण्ट. डोण्ट वेस्ट युअर टाईम विथ दॅट स्कॉउण्ड्रल नेक्स्ट टू यू! लूक ऍट अदर स्टुडण्ट्स! लूक ऍट मिस. प्रधान! बी सिंसीयर लाईक हर!"
सोलंकी मिसच्या ह्या टिप्पणीवर पूजा अन सॅवियोचे चेहेरे दोन विरूद्ध भाव दर्शवू लागले. पुढच्या बाकावर बसलेल्या पूजाने आनंदाने पण मिश्किलीत करणकडे वळून पाहिलं. करण थोडा ओशाळला.

"धिस इज अ लास्ट वॉर्निंग! यू मे सिट डाऊन!" सोलंकी मिसने चश्मा डोळ्यावर पुन्हा चढवला. सगळ्यांना हायसं वाटलं. तसा करण सोलंकी मिसचा आवडता स्टुडण्ट होता त्यामुळे भिती नव्हती.
"डीड यू हियर दॅट?", सॅवियो अस्पषट्सा कुजबूजला...."ती मला स्कॉउण्ड्रल म्हणाली!!!"...
अर्थातच होपलेस आणि यूजलेस ह्या सॅवियोच्या नेहेमीच्या विशेषणांत आज एक नवी भर पडली होती.
करणने गणिताच्या पुस्तकात डोकं घातलं. सॅवियोच्या ऍन्टि सोलंकी केमेण्ट्सकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो अभ्यासात गुंतला. अर्थातच त्याला पुन्हा ओरडा खायचा नव्हता. करण आपल्याला प्रतिसाद देत नाहीये म्हणून इथे सॅवियो रागात सोलंकी मिसचं कार्टून त्याच्या वहीच्या मागल्या पानावर काढू लागला.
तास संपता संपता सॅवियोचं ते व्यंगचित्रही संपलं. मधली सुट्टी झाली अन सगळे वर्गाबाहेर पडले. आजूबाजूच्या काही मंडळींना ते कार्टून दाखवून सॅवियोने करमणूक करून घेतली अन स्वतःचा राग शमवला.
"करण.... सॅवियो! सॅवियोऒ!!!" दानिश शाह मागून दोघांना हाक मारत होता.
"च्यायला!", सॅवियोने तोंड लपवलं, "सावकार आला वाटते!.. यार करण! ५० रूपये आहेत काय?"
"कशाला", करणने विचारलं.
"अरे गेल्या वीकमध्ये मी हॉकी प्रॅक्टीसच्या वेळी नी-बॅंण्ड आणायला विसरलो. तेव्हा पीटीच्या सरांनी सगळा सेट आणल्याशिवाय आत येऊ दिलं नाही. मग दानिशकडून पन्नास रूपये उसने घेऊन मी ते नी-बॅण्ड्स बाजूच्या स्टेशनरी दुकानातून विकत घेतले. त्याला मी आज परत देतो सांगितलेलं! पण ..."
"..विम्बल्डनच्या जोशात विसरलास!"
"होय! आणि मग आता नाहीयेत म्हटल्यावर तो रडायला लागेल आणि तुला माहितिये ना! दानिश इज सच अ ड्रामा क्वीन!", सॅवियो मुळूमुळू उत्तरला.
"म्हणजे?"
"अरे! गेल्या खेपेस हेतनला थोड्यावेळ्यासाठी त्याने त्याचं स्वीस घड्याळ दिलं. ते हेतनच्या हातात बॅटरी संपून बंद पडलं. तरी पूर्ण शहानिशा न करता हा हेतनच्या नावाने रडू लागला. शेवटी हेतनकडूनच घड्याळजीकडे उघडून नवी बॅटरी टाकून घेतली त्यानं!"
"आणि एवढं असूनही तुला आयत्या वेळेला पैसे उसने घ्यायला हाच मिळाला?", करणने विचारले.
"काय करणार? माझं तुला ठाऊकच आहे! माझ्या डिक्श्नरीत लक हा शब्द बॅडच्या सोबत येतो!"
करण उपहासाने हसला आणि त्याने पन्नास रूपये काढून दिले,"हे घे! माझे लॅब कोटचे आहेत! माझा जुना फाटलाय म्हणून नवा घ्यायला मी आईकडून घेतलेले. आज सायन्स प्रॅक्टीकल नाहिये तेव्हा तुला उपयोगी पडतील!"

पन्नास रूपये सॅवियोने घेतले नसतील तोवर दानिश शाहाने सॅवियोला गाठलेच.
"माझे पैसे?"
"हे घे!"
"नोट जुनी दिसतेय!"
"मग नवीन नोटेसाठी उद्या ये!"
"नको असूदे. ही चालवीन."
नोट मिळाल्यावरही दानिश शाह दोन सेकंद काहीतरी ऎकण्याच्या अपेक्षेने त्यांच्या समोर उभा राहिला होता.
"थॅंक यू दानिश. खूप दानशूर आहेस!", सॅवियो खोटी कॄतार्थता चेहेऱ्यावर आणत म्हणाला.
दानिश खूष झाला अन नोटेतून सूर्याकडे बघत, नोट तपासत निघून गेला.
"पाहिलंस! एकदम सावकार!"
"जाऊ दे रे."
"जाऊ दे काय? एवढा श्रीमंत असूनही एवढा कद्रु? अरे त्याच्या वडीलांचा इस्तांबूलला मसाल्याचा मोठा बिझिनेस आहे आणि त्याची आई फिल्मफेयर मॅगझिनची असिस्टण्ट एडिटर आहे. एवढं असूनही..."
"काय!", करण एकदम चमकला?
"मग काय एवढा श्रीमंत आहे तो..."
"...अरे ते नाही! त्याची आई फिल्मफेयरची हेड आहे?"
"नाही असिस्टण्ट एडिटर!"
"तेच ते!..." करण पुढचं काहीही न बोलता मागे पळाला.
सॅवियो काहीच न कळल्याच्या आवेशात तिथेच उभा होता. दोन मिनिटात करण खूश होऊन परतला.
"कुठे गेला होतास!", सॅवियोने आठ्या पाडल्या.
"दानिश शाह रॉक्स!"
"व्हॉट्ट! आर यू ओके?"
"यप्प!"
"काय झालं? काय सांगशील का?
"दानिश शहाला नव्या फिल्मफेयरची कॉपी आणायला सांगितलीय!"
"पण अजून नवा महिना यायचाय!"
"त्याधीच आणायचीय!"
"का?"
"अरे दोन आठवड्यांनी मेनकाचा बर्थडे! न्व्या फिलफेयरमध्ये कव्हर आणि फ्रण्ट पेज तिचंच असणार आहे ह्या वेळी."
"मग पुढच्या महिन्यापर्यंत थांबला असतास ना?"
"अंहं! अजिबात नाही. अरे मेनकफॅन्सच्यांत चुरस असते. मेनकाचे फिल्मी मॅगझिनवरचे कव्हर पेजेस मिळवण्याची. मला जर तिच्या बर्थडेच्या वेळी मेनकाचं पुढल्या महिन्यात छापून येणारं कव्हर पेज स्कॅन करून माझ्या साईटवर टाकता आलं तर किती भाव मिळेल मला मेनका फॅनग्रुपमध्ये!"
"यू आर क्रेझी! अरे आधीच तू आहेस ना एवढा फेमस. क्रेजीकरन!", सॅवियोने डोळे मिचकावले.
करण हसला पण तोच ‘क्रेझीकरन’ वरून त्याला आठवली कालची रात्र. कुण्या एका माथेफिरूने मेनकाच्या चारित्र्यावर विनाकारण उडवलेले शिंतोडे! करण पुन्हा अस्वस्थ झाला.
"हे करण! काय विचार करतोयस?", सॅवियो करणच्या चेहेऱ्यासमोर हात हलवित म्हणाला.
"काही नाही! जस्ट एक्सायटेड!", करण चेहेऱ्यावरचे भाव लपवत म्हणाला.
"अरे पण दानिश शाह मानला कसा? पक्का सावकार तो! काय गहाण ठेवलंस त्याच्याकडे? अं?", सॅवियोने भुवया उंचावल्या.
करण हळूच मागे मानेवर हात चोळू लागला,"मॅगझीन आणल्यावर पुढच्या तीन दिवसांचा मॅथ्सचा फ्री होमवर्क!", करण बोलता बोलता अडखळला. सॅवियोच्या भुवयांची स्थिती बदलणार होती.
"व्हॉट्ट! दॅट्स सो अनफेअर!", सॅवियो चिडला, "मी तुझा मित्र असून तू माझा कधी होमवर्क केला नाहीस!", सॅवियोने रागात भुवया आकुंचल्या
"तुझी आई फिल्मफेयरची एडिटर आहे का?"
"असिस्टण्ट एडिटर!"
"हो तेच ते! नाहिये ना. मग मी का तुझा होमवर्क करू?"
"करण दॅट इज रियली मीन!", सॅवियो ओरडला.
"व्हॉट मीन! आणि पेपरात माझ्या पुढे बसून मागे वळून वळून माझ्या सम्सची कॉपी करतोस त्याचं काय?", करणनेही मग आवाज चढवला.
भांडण चव्हाट्यावर येणार तोच मागूनच प्रिन्सिपल सिस्टर निलिमा गेल्या, ते दोन मिनिटं दोघे गप्प बसले. प्रिन्सिपलच्या ऑफिससमोरचचा बाक हा ‘प्रॉक्सी होमवर्क’ आणि ‘एक्झाम कॉपी’ विषयी बोलायचा कट्टा कदापी नव्हता. हे त्या चाणाक्षांनी जाणलं अन ते साळसूदपणे पुढच्या लेक्चरला चालते बनले.

भाग चार:
"काय चाल्लेय तुझं मघापासून? किती ते चॅनल बदलणार? एक धड तरी ठेव किंवा तो टि.व्ही. बंद तरी कर." आई थोडी चिडून म्हणाली. करण आणि त्याची आई सुलभा बाजूलाच बसलेले टि.व्ही. पाहत होते. करणने रिमोटची सगळे नंबर तीनदा दाबून पाहिले होते. टि.व्ही.वर काहीच मनोरंजन चालू नव्हतं.
"हो गं! ठेवतो ना.", करणनेही मग आठ्या पाड्लया अन एक फिल्मी चॅनल ठेवला.
"वेल्कम टू बॉलिवूड न्यूज!", टिव्हीवरील वी.जे. सांगत होती, "सुमीत सिन्हा और गौरी पंडित की नयी ‘सात सपने’ बॉक्स ऑफिसपर पीट गयी। ये उन दोनोकी साथ साथ दूसरी फिल्म है। ..."
खरं तर सॅवियोची वाट पाहत करण वेळ मारत होता. बॉलिवूड न्यूज वर मेनका शिवाय आणखी कोणीही करणला उल्साहित करत नसे. आईही पेपर वाचित होती. त्यामुळे टि.व्ही. खरं कोण पाहत होतं हे सांगणं कठीणच होतं.
"कधी येणार सॅवियो? ५ चे साडेपाच झालेत." करणने घड्याळाकडे पाहिलं. आई पेपरात. तिथे टि.व्ही.वर त्या वी.जे.ची बडबड चालू .
"और अब एक खास खबर! हजारों दिलों की धडकन मेनका के बारेमें नयी कॉण्ट्रोवर्सी आजकल सुनाई दे रही है।", करणने घड्याळाकडे बघत टि.व्ही.कडे कान टवकारले. "सुना है की मेनकाके एक खास करीबी एन.आर.आय. दोस्तने उनके और अपने पुराने अफेयर के बारेमें किसी न्यूज चॅनल को काफी गुप्त बातें बतायी है। जिसमें एक काफी इंटरेस्टींग लव्ह ट्रायंगल भी है। और तो और ये भी सुनाई दिया है की मनिष भट़्ट उसपे नयी फिल्म भी बना रहें है। तो आखिर इस फिल्म में हिरोईन मेनका की रायवल मालविका काश साईन होही जायेगी। आखिर मनिष भट़्ट सेक्स और मालविका के बगैर कैसे रहेंगे? देखतें है की मेनका के सेक्रेटरी टिक्कू की इसपे क्या राय है? ... "
"एन.आर.आय.? अफेयर? लव्ह ट्रायंगल?", करण ताडकन उठला.
समोर टि.व्ही.वर थुलथुलीत टिक्कू अवतीर्ण झाला. करणचं लक्ष पुढच्या मुलाखतीत लागलं होतं, "टिक्कूजी क्या ये सच है की मेनकाजीके कोई अमरिकी दोस्त आजकल मुंबईमें आये हुऎ हैं?"
"जी।!, टिक्कूने आपल्या बारीक आवाजात म्हटलं.
"क्या ये भी सच है की मेनकाजी और उनके बीच काई करीबी रिश्ता था?"
"नही। बिलकूल नहीं।"
करनने भुयव्या उंचावल्या.
"आप तो मुकर रहें है पर हमने ये सुना है की ये रिश्ता इसिलिये टूट गया था की कोई और मेनकाजीके जिंदगी में आ गया था?"

"देखिये ये मुझे मालूम नही। लेकीन मुझे येह मालूम है की मेनकाजी और उनके दोस्त के बीच अब सिर्फ अच्छी दोस्ती है। और कुछ नही। जो हुआ वो क्या और क्यूं हुआ ये मुझे पता नही। लेकीन जो अभी है वो सिर्फ गहरी दोस्ती है बस्स।"
"लेकीन फिर भी आपको कुछ तो पता होगा ही?"
"देखिये मैं दस साल पहले मेनकाजीका सेक्रेटरी बना हूं। ये बात उस्से भी पाच छे साल पुरानी है। मुझे इसके बारे में कुछ भी नही पता। लेकीन इतना पता है की मेनकजी इस अफवा की वजह से काफी व्यथित हैं और टेलिफोन कॉल्सभी नहीं ले रहीं। इसिलिये मेरी आप सब लोगोंसे गुजारिश है की प्लीज आप इस बात को इतना महत्त्व देना बंद किजीये।"
"लेकीन ये एन.आर.आय दोस्त हैं कौन? क्यूं उन्हे इतना गुप्त रखा गया है?"
"देखिये वो खुद अपनी शख्सियत गुप्त रखना चाहते हैं। ये उनकी मर्जी है।"
"लेकीन फिर मनिष भट़्ट की फिल्म के बारेमें आपका क्या खयाल है?"
यावर टिक्कू थोडा भडकला, "मनिष भट़्ट उन्हे चाहें उस विषय पर फिल्म बना सकतें है। वैसेभी कॉट्रोवर्सी उनसे दूर कहा रहती है। ये शायद उनका और एक गिमिक होगा!"
"क्या येह सच है की इन मेनकाजीके दोस्त का नाम गौतम दोशी है?.... "
"ओह माय गॉड!", करणने आ वासला होता.... तिकडे टिक्कूचं "नो कमेण्ट्स प्लीज!" ची टेप सुरू झाली.
आईने थोडक्यात करणकडे बघितलं अन पुन्हा पेपरात मान घातली.
"आई! माहितीये?", करणने गोंधळलेल्या स्वरात आईला म्हटलं.
"काय?"
"परवा काय झालं?"
"काय?", आईने पेपरातच डोकं घातलं होतं.
" एका ऑनलाईन चॅट मध्ये मला कुणीतरी माथेफिरू भेटला होता. म्हणाला की तो मेनकाचा मुलगा आहे!"
आईने झटकन पेपर दूर सारला, "काय?", हा ‘काय’ मघासच्यापेक्षा नक्कीच मोठा होता.
"हो! आणि म्हणाला की मेनकाचं गौतम दोशी नावाच्या माणसाशी अफेयर होतं आणि ती एका तिसऱ्या माणसाकडून प्रेगेनण्ट राहिली होती. तिने ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं. तोच तो तिचा मुलगा!"
"कोण होता तो? आणखी काय म्हणाला?", आईने गोंधळून विचारलं.
"काही नाही म्हणे, एवढंच हे सगळं तिची फिल्म लाईन जॉईन होण्याधीचं लफडं होतं."
आई दोन मिनिटं थोडी चकितच होती मग तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले.

"फिल्मी आयुष्याधीचं नं मग ते खोटच असणार? पेपराझींचा फक्त सेलिब्रिटीच्या फिल्मी आयुष्यावर कण्ट्रोल असतो. त्याधी काय झालं ह्यावर त्यांचा फक्त कयास असू शकतो. मला तर बाई ही त्या मेनकाला फसवायची कुणाचीतरी चाल वाटते. बऱ्याच दिवसात तिच्याकडून कुठलं गॉसिप आलं नव्ह्तं. तोच तिचा एन.आर.आय मित्र कुठूनतरी आला, तिला भेटला अन ह्या अफवा सुरू. तो जो कुणी तुला ऑनलाईन भेटला ना तोही ह्या गटातला असेल.", आई शांतपणे पुन्हा पेपरात डोकं घालून म्हणाली.
करणही आईच्या ह्या विचारावर सहमत झालेला वाटत होता.
पण त्याच्या मनात कुठेतरी एक हुरहुर लागली होतीच. तेवढ्यात सॅवियो आला.
"लेट्स गो! उशीर झालाय ना. सॉरी रे! घरी मम्मी लेट आली. मग मोठा भाऊ म्हणून क्रिस्टल ला सांभाळत थांबावं लागलं. ओह बाय द वे... हॅलो आण्टी!"
करणच्या आईने हसत विचारलं, "हॅलो. कशी आहे क्रिस्टल? गेल्या आठवड्यापासून के.जी.त जायला लागली ऎकलं मी?"
"हो! के.जी. एकदम फर्स्टक्लास चाल्लंय.", सॅवियो डोळे मिचकावले, "आत्ता मलाच ए, बी, सी शिकवते!"
मिश्किलीत आई उठली अन करणला, "लवकर ये. जेवायच्या आधी." असं बोलून किचनमध्ये निघून गेली.
करण डेनिम जॅकेट चढवून सॅवियो सोबत बाहेर पडला.
"सॅवियो अरे मी ते तुला सांगितलेलं बघ, ब्लॅकवलचर बद्दल! आठवतंय?"
"कोण तो मेनका हेटर ना? हो. त्याचं काय?"
"आज टिव्हीवर त्याने सांगितलेल्यासारखीच एक न्यूज ऎकली मी. मेनकाचा आधीचा बॉयफ्रेण्ड इंडियात आलाय अन इथे येऊन तिला भेटला. त्यानंतर त्याने त्यांच्या अफेयर विषयीच्या आपल्या काही गुप्त गोष्टी कुठल्यातरी न्यूजचॅनलना कळवल्या. यावर सगळा वादंग उठलाय!"
"वादंग?!", सॅवियो गोंधळला
"अरे कॉण्ट्रोवर्सी रे!", सॅवियो कॉन्व्हेण्ट शाळेत शिकणारा एक अमराठी मुलगा आहे हे करणच्या मग ध्यानात आलं.
"ओके. मग?"
"त्यात त्या मनिष भट़्टने ह्या गॉसिपवर नवा पिक्चर काढायला लावलाय. त्यात तो मालविकाला घेणारेय..."
"काय? मालविका इन मनिष भट़्ट फिल्म? वुह्ह्हू!" सॅवियोने आनंदात टाळ्या पिटल्या. उत्तान मालविकाला छोट्या कपड्यात पाहण्याची स्वप्न सॅवियो उभ्याचा उभ्या पाहू लागला, पण मग ध्यानावर येऊन करणचा सिरियस मूड बघून "ओह्ह बिच्चारी मेनका!" असं म्हणत त्याने आपला आनंदी चेहेरा झटक्यात पालटला.

"इट्स ओके, यू कॅन चियर. नो नीड फॉर अ फॉल्स कॉन्डोलन्स.", करणने थोड्या रागातच म्हटलं.
"फरगेट ईट यार", सॅवियोने आपले नेहेमीचे आवडते शब्द म्हटले, "कशाला ही संध्याकाळ ह्या अर्धवट माहित असल्या नसल्या फिल्मी बातम्यांवर घालवायची? छान पैकी बोलिंग करायाला जाऊ चल."
आणि असं म्हणून त्यांनी आपल्या सायकल्स वर टांग मारली अन ते अंधेरी लिंक रोडला निघाले. संपूर्ण रस्ता सायकल चालवित करण मनात फक्त गौतम दोशीचाच विचार करत होता.....
२०० पॉईण्ट्स! करणचा नवा रेकॉर्ड!
सॅवियो अजून ८० वर! ही अंधेरीचा बोलिंग ऍली करण अन सॅवियोची अत्यंत आवडती जागा.
"मला आज एकही फुल्ल स्ट्राईक मिळाला नाहिये आणि तुला सात मिळले." सॅवियोने गाल फुगवले आणि करणने ऎटीत कॉलर ताठ केली.
"जाऊ दे रे. एव्हरी डॉग हॅज हीज डे!" करणने विनोद केला तसा सॅवियो अजून रागावून त्याच्याकडे पाहू लागला.
आता दिलेलं १०० रूपयांचं क्रेडीट संपत आलं होतं. फक्त एक सेट उरलेला. त्या एका सेटच्या जोरावर सॅवियोने करणला हरवणे शक्य नव्हते. पण तरीही सॅवियोने करणला बोट उंचावून म्हटलं, "क्रॉस दॅट २१० मार्क आणि मी तुला ५० रूपये देईन!"
करणने त्याने दाखवलेल्या स्कोअर बोर्डकडे पाहिले अन त्याच ऍलीत दुसऱ्या कुणीतरी युनिकॉर्न नावाच्या प्लेयरचा २१० चा स्कोर दिसत होता. हे चॅलेंज करणने स्वीकार केलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला अन आवडीचा ओशन-ब्लू-बॉल व्यवस्थित पुढच्या पिन्सच्या सेटकडे फेकला. बॉलने सरळ दिशा पकडली पण हाय! मध्येच दिशा बदलून एकाही पीनला धक्का न शिवता बॉल गटर मध्ये घुसला.
एक चान्स वेस्ट.
"बूऊऊऊऊ!" सॅवियोने ‘कशी जिरली!" म्हणून करणचा आत्मविश्वास खच्ची करायचे निष्फळ प्रयत्न केले, पण करण खरंच पेटला होता. अजून एक चान्स बाकी होता. तो २१० चा स्कोर त्याच्या जणू जीवनमरणाचा प्रश्न झाला असावा!

करणने पुन्हा त्याचा ओशन-ब्लू बॉल व्यवस्थित बोटांत अडकवला अन त्याच्या लेनच्या बरोबर मध्यभागी उभा राहून बोलिंगची एक्स्पर्ट पोझ घेतली अन खाली वाकून बॉल नीट सरपटत फेकला. तीन सेकंद त्याचा श्वास आतच अडकला असावा...
... आणि बॉल ने स्ट्राईक केलं. आजची ही आठवी स्ट्राईक! करणचा पर्सनल बेस्ट स्कोर!
"जिंकलो!" म्हणत करण सॅवियोला चिडवत ब्रेक डांस करून दाखवू लागला. सॅवियो ओशाळला.
आता स्कोर बोर्ड वर फक्त करणचा कूलकरन आणि यूनिकॉर्नच २१० दाखवत होते.
"हाय करन!", पाठून एक मधाळ आवाज आला.
ब्रेक डांस करत करणने मागे वळून पाहिलं तसं समोर पूजा प्रधान! त्याचा ब्रेक डांस पाहून ती थोडी गोंधळलेलीच दिसत होती.
करणने झटक्यात डांस बंद केला.
"हाय पूजा!", करण थोडक्यात.
"इथे कुठे?", पूजा.
"असंच!", करणचं एका शब्दात उत्तर.
"मी तुझं नाव पाहिलं स्कोरबोर्डवर. माझ्याएवढा स्कोर पाहिल्यावर मी म्हटलं बघूया कोण आहे ते. तर तू दिसलास!"
"ओह! म्हणजे यूनिकॉर्न..."
"हो मीच यूनिकॉर्न!"
एका मुलीच्या स्कोरला टफफाईट दिलेली बघून करणचा बेस्ट स्कोरचा आनंद क्षणात मावळला.
"ओके", असं बोलून करण पुन्हा मुका झाला, पूजा कडे बघत.
"आख्ह:अंख्ह!", पाठून कुणीतरी घसा साफ करीत होतं.
"सॉरी!", करणने त्रागा करीत म्हटलं, "सॅवियोही आहे माझ्यासोबत."
"हाय पूजा!", सॅवियो सोज्वळपणे पुढे येऊन म्हणाला.
"हॅलो सॅवियो!", पूजानेही मग दोनच शब्द म्हटले.
पुढची दोन मिनिटं एकमेकांची तोंड बघण्यातच गेली.
"कोल्ड कॉफी?", सॅवियोने एकांत फोडला.
"व्हाय नॉट!", पूजानेही पटकन होकार दिला.
अन तिघे ‘कॉफी डे’ च्या काउन्टर कडे निघाले. पुढे दोघे लव्हबर्ड्स. मागे विसरला गेलेला सॅवियो!
"तर मग आज सॅटरडॆ! काय केलंस?", पूजानं चॉकोलेटमोकाची एक सिप घेत विचारलं.
"काही नाही. आता काही वेळ सॅवियोबरोबर आहे, नंतर संध्याकाळी समीरदादा बरोबर जीम.", करणने कॉफीतच लक्ष घालून म्हटलं. पूजाकडे पाहत एक पूर्ण वाक्य म्हणायला अजून त्याच्यात अवसान आलं नव्हतं. सॅवियो करणची मजा बघत त्याची आईस्क्रीम कॉफी मिटक्या मारत चाखत होता.
"तू काय केलंस पूजा आज?", सॅवियोने मध्येच चोमडेपणा केला तसे करणने डोळे वटारले.
"काही नाही. मीही संध्याकाळी माझ्या वडिलांच्या मित्रांना भेटायला जाणार आहे, जे डब्ल्यू मॅरियट मध्ये"
"कूल. म्हणजे कोणी स्पेशल आहे का?", करणला बोलण्याचा काहीही चान्स न देत सॅवियोने पुढचा प्रश्न केला

"हो माझे पप्पांचे खास दोस्त आहेत. त्यांच्या सोबत फॅमिली डिनर आहे.", पूजा म्हणाली.
"म्हणजे तुझी संध्याकाळ फिक्स आहे.... आऊच्च!!", खालून करणने सॅवियोला एक कीक मारली तसा सॅवियो कळवळला. पूजा गोंधळून सॅवियोकडे पाहू लागली. एक नजर करणकडेही गेली. करणने आपल्याला काहीही माहित नसल्याचे दाखवत पुन्हा जवळजवळ रिकाम्या कॉफी ग्लासमध्ये डोकं घातलं.
"म्हणजे छान!", सॅवियो उसनं हसू आणत पाय लटपटत म्हणाला.
तेवढ्यातच पूजाचा मोबाईल वाजला.
"हॅलो? हा आई बोल... हो माहितीये. हो ग. मी येईन. तुम्ही जा पुढे. टॅक्सी पकडेन. अगं अंधेरी ईस्टलाच यायचंय ना. येईन ना मी. हो हो माहितीये साडेसात. हो गं रूम ३०२. आता नाव का विचारतेयस? आधी मी भेटलेय ना त्यांना लहान असताना. हो गं. गौतम दोशी! ओके? आय नो मॉम...."
"फुर्र्र्र्र!", ‘गौतम दोशी’ नाव ऎकताच सॅवियोने कॉफी फुंकली अन करण ताडकन खुर्चीवरून उडाला.
पूजा दोन मिनिटं घाबरलीच.
"काय झालं. एनी प्रॉब्लेम?", पूजा ने विचारलं.
"तू गौतम दोशी म्हणालीस?", करणने प्रश्न केला. अगदी पूजाच्या डोळ्यात पाहत (!)
"हो. का? मी सांगितलं ना ते पप्पांचे फ्रेण्ड. तेच ते. यूएस वरून आलेत. "
"आय नो! द फार्मा विझार्ड!", करण म्हणाला.
"व्हॉट?", पूजा गोंधळली, "तुला कसं..."
"ते जाऊदे! डू यू नो एनीथींग अबाऊट हीज रिलेशनशिप विथ ..." करणने थोडा आवंढा गिळला, "..विथ फिल्म ऍक्ट्रेस मेनका?"
पूजा संशयित नजरेन दोघांकडे पाहू लागली. आता सॅवियोने कॉफीत तोंड घातलं होतं. तसं तिला करण मेनकाचा फॅन आहे हे माहित होतं पण हा प्रश्न थोडा पर्सनल वाटत होता.
"तू कशा बद्दल म्हणतोयस?"
"टिव्हीवर..."
"हो ते?...", पूजाने करणला तोडलं, तिच्या चेहेऱ्यावरचे संशयित भाव नाहीसे झाले होते, "..आय थिंक इट्स जस्ट अ गॉसिप!"
"आर यू श्युर?"
"हो. पण असं का विचारतोयस?"
करणने ब्लॅकवल्चरची स्टोरी पूजाला सांगू की नको ह्या विचारात काही सेकंद घालवले. मग सॅवियोनेच पुढाकार गेतला... "काही नाही गं. यू नो करण इज कन्सर्न्ड अबाऊट मेनका. ही इज हर फॅन ना..."
पूजा हसली आणि म्हणाली, "तुला हवं तर मी त्यांच्या कडून काही खबरबात काढते ह्याविषयी. आय कॅन बी अ गॉसिप गल टूडे!", पूजाने डोळे मिचकावले.

करण हसला, "नको इट्स ओके. इट्स कूल."
"...याह जस्ट फरगेट अबाऊट ईट!", सॅवियो. अजून कोण?
"चल मी निघते. बाय! थॅन्क्स फॉर द कॉफी!"
"नो प्रोब्लेम!", करण पुन्हा त्याच्या द्विशब्द संभाषणावर आला.
"बाय सॅवियो!", असं म्हणून पूजा निघून गेली.
"क्या ड्युड! इव्हनिंग स्पेशल झाली म्हणायची!", सॅवियोने करणचा पाय खेचला.
करण थोडा लाजला अन दोघे बील फेडून घरी निघाले. पण येतानाही करणचा फक्त गौतम दोशीविषयीच विचार चालू होता.
**********************************
भाग पाच:
करणने बेल वाजवली तसा आईने दरवाजा उघडला.
"अरे किती वेळ लावलास? सातला यायचं होतंस. आता साडेसात वाजलेत. तिथे समीर जीममध्ये तुझि वाट पाहतोय. दोनदा फोनही केला त्यानं. आताही त्याच्याशीच बोलत होते.", आईने त्रस्त चेहेऱ्याने म्हटलं.
"हो गं! तिथे बोलिंग ऍलीत ऊशीर झाला. जातोय ना मी आत्ताच निघतोय."
"तुझ्या मित्राचा दानिशचा फोन आलेला. कुठलतरी मॅगझीन आणलंय त्यानं. ते त्याला तुला द्यायचंय. आज साडेसात पर्यंत घरी आहे तो असं म्हणाला."
"काय दानिश ने मॅगझीन आणलं? ग्रेट!!!", करणच्या चेहेऱ्यावर आनंदाची ओसंडू लागला, "मी दोन मिनिटांत निघतोच."
असं म्हणून कपडे बदलून जिमची ट्रॅक सूट अन पॅण्ट घालून करण कधी निघाला ते आईला कळलेच नाही.
करणे उत्साहाच्या भरात सायकल दनिशच्या घराकडे हाकली.
"हाय दानिश!", दानिशने दार उघडलं तसा करण स्मित आणून म्हणाला.
दानिशने नवं मॅगझिन करणला दिलं अन म्हणाला, "होमवर्कचं लक्षात आहे ना?"
मॅगझीन अधाशिपणे हाती घेऊन त्याच्या कव्हरवर छापलेलं मेनकाचं पोर्ट्रेट बघून करण एक्साईट झाला होता. दानिशच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत तो परत फिरला.
मोठे भुरे डोळे, डार्क तांबट कलर चे सिल्की केस, चेहेऱ्यावर नेहेमीची मादकता आणि काळा महोगनी शॉर्ट टॉप अन खाकी थ्री फोर्थ जिन्समधून साकार केलेल्या कॉलेज तरूणीच्या आभासाने फोटोग्राफरने मेनकाच्या टाईमलेस ब्युटीचा नेमका सूर पकडला होता. करणला फ्रन्ट बघत हरवून गेला.
त्याच धुंदीत त्याने पान सत्तावन्न उघडले अन तो आठ पानी इण्टरव्हू तिथच बसून वाचून काढला.
इण्टरव्ह्यूत बराचश्या गोष्टी नेहेमीच्या होत्या. तिचं लहानपण, कॉलेज, फिल्मी आयुष्यातले उतार चढाव, अवॉर्ड्स, मालविकाशी असलेला बेबनाव. तेच ते. पण त्याने सातवं पान उघडलं अन पुढचा भाग करणला सल लावून गेला...
(इन्टरव्ह्यू)....
मग आता एवढा सक्सेस मिळाल्यावर पुढे काय?: ... पुढे? अरे पुढे जाण्याच्या हट़्टपायी मागे बऱ्याच गोष्टी गमावून बसलेय. त्यांचा अजून हिशेब मांडायचाय. कधी कधी असं वाटतं कित्येक लोकांच्या मनाशी खेळून, त्यांना दुखवून खोट्या स्वार्थापायी मी स्वतःसारखी राहिलेच नाही. म्हणजे कुणा स्पेशल माणसाविषयी बोलतेस का?: ... कुणा स्पेशल? (हताशपणे हसून) कुणा स्पेशल नाही तर कित्येक स्पेशल माणसांविषयी. सगळेच जे आता पारखे झालेत.
ते स्पेशल कोण होते?: ... ते म्हणजे मेनकाची मित्र मंडळी, माझे सगे सोयरे. सग्यांहूनही काही सख्खी लोकं. सगळ्यांनाच.
मग आत्ता त्यांना शोधलं का?: ...नाही रे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. स्वतःच दुःख पचवते. उगीच जुनी प्रेतं कां उकरायची? आता फॅन्स साठी जगतेय.
मग एनी रिग्रेट्स?: ...हो. (इथे डोळे ओलावले) त्या जुन्या सगळ्यांना सॉरी म्हणायचंय. त्यांच्या गळ्य़ात गळे टाकून रडायचंय. वाटतं हे स्टार व्हायचं ओझं फेकून द्यावं. सगळा मेक-अप पुसून टाकावा. अंगावरचे फॅन्सी कपडे टराटरा ओरबाडून आरशासमोर उभं रहावं. स्वतःवर हसावं. मला माहितीये ‘ते सगळे’ मला ‘असेच’ पाहत असतील, माझ्यावर असेच हसत असतील.
पण मग असं करताना फॅन्सचं काय?: ...तोच तर अडसर आहे. फॅन्सचं ओझं बरंच जड आहे रे. टाकता येत नाही. मेक-अप चेहेऱ्यावरून निघत नाही. हे कपडेच आता मेनकची कातडी झालेत. हे सगळं झुगारता येत नाही.
पण मग एवढे फॅन्स असताना, मेनका दुःखी का व्हावी?: खरंय ते ...पण शेवटी मीही माणूसच आहे ना. चुका करून प्रायश्चित्त घ्यावं, चारचौघांसारखं सॉरी बोलून मन हलकं करावं असं आता होत नाही. आकाशात स्टार झालेय तर आपल्या जमिनीशी कशी रुळणार?
मग त्या लोकांना काही मेसेज... : एवढंच की मला माफ करू नका. मला माफी स्वतः मागायचीय.... (इथे मेनकाने काही मिनिटं मागून घेतली)
करणच्या डोळ्यात पाणी तराळलं. मेनकाची एवढी हळवी मुलाखत या आधी कधीही त्याने वाचली नव्हती. तिचं एवढं मानवी रूप ह्याधी कधीही दाखवलं गेलं नव्हतं. पण ह्या खेपेस असं काय झालं असावं? ह्या विचारात मग करणला गेल्या काही दिवसांपासून चाल्लेला मामला आठवला अन त्याचं मन पुन्हा विचलित झालं. गौतम दोशी, ब्लॅकवल्चर, टिक्कू सगळे त्याला आठवले. आज अचानक ब्लॅकवल्चर साठी त्याला वाईटही वाटून गेलं. पण तरी त्याची मेनकाचं अफेयर आणि प्रेगेनन्सीची स्टोरी मानवत नव्हती.
त्याच थोडक्या विमनस्क स्थितीत करण दीड तास ऊशिरा जीममध्ये पोहोचला. समीरने त्याला हातातलं मेनकचं पोस्टर असलेलं फिल्मफेयर मॅगझीन पाहून सुरूवातीस थोडं धारेवर धरलं. पण करण गुपचूप पणे त्याची जीम प्रॅक्टीस करू लागला. समीरची भांडणाची टाळी एका हाताने जास्त वेळ वाजू शकली नाही.
थोड्या वेळाने करणला गप बसलेला पाहून समीरला कण्ठ फुटला.
"करण, मला तुला काहीतरी विचारायचं होतं...", समीर स्ट्रेच करीत म्हणाला.
"काय?", करणचे ट्रेडमील वर चार कि.मी. एव्हाना झाले होते, त्यामुळे त्याने धापा टाकतच विचारलं.
"धिस इज अ बिट सिरीयस, रागावणार नाहिस ना?", समीरने करणकडे न पाहत विचारलं.
करण संशयित झाला, "इट डीपेण्ड्स. पण तरी काय विचारायचंय?"
"सी!", समीरने स्ट्रेचिंग मंद केलं, "तू आता नववीत आहेस. पुढे दहावी. त्यानंतर कॉलेज. त्यात तुला आय.आय.टीत जायचंय. तुझ्यावर आत्ताच अभ्यासाचा एवढा बोजा आहे, मग ह्या एक्स्ट्रा करीक्युलर ऍक्टिविटीज आणखी किती दिवस चालणार?"
"म्हणजे?", करणला नीट उमगलं नाही.
"ओ.के.", समीरने शेवटी स्ट्रेचिंग थांबवलं अन करणकडे पाहत तो म्हणाला, "म्हणजे मला ह्या मेनका फॅड विषयी बोलायचंय."
करण दोन मिनिटं ट्रेंडमिलवर गडबडला. थांबून त्याने प्रश्नार्थक चेहेऱ्याने समीरकडे पाहिलं. समीरचा चेहेरा बराच सिरियस होता.
"पण तू हे का विचारतोयस?", करणने उतरत प्रश्न केला.
"आजकल तू बराच मेनका प्रकरणात गुंतलायस. अभ्यासात तुझं लक्ष नाही. काल पप्पांचा वाढदिवस होता तेही तुला ठाऊक नव्हतं. आईला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील. पण इकडे तू काल पूर्ण संध्याकाळ तिच्या वेबसाईट वर होतास. मी पाहत होतो. आजही हे मॅगझिन आणल्याच्या नादात तू मला इथे दीड तास लटकवलंस. आय मिन कमॉन! शी इज जस्ट ऍन ऍक्ट्रेस्स. तिच्यात एवढं मन का गुंतवायचं...."
"वेट अ मिनिट!", करणने समीरला मध्येच तोडलं, "मला लास्ट सेमिस्टर मध्ये चांगले पर्सेण्ट मिळाले. होना?"
"हो..."
"स्कूलमधूनही माझ्या प्रोग्रेसविषयी तुम्हाला चांगला रिपोर्ट मिळालाय. राईट?"
"येस", समीरला करणचा रोख कुठे जातोय तो कळला, "मला माहितीये पण.."
".. मी कुठे काही मस्ती किंवा मेस्स करून ठेवलिये?"
"नाही."
"मग माझ्या ह्या हॉबिचा तुला आता का त्रास होऊ लागला?", करनने आठ्या पाडल्या.
"तसं नाहिये रे. पण हॉबीचं ऑब्सेशन ह्वायला नको आणि पुन्हा तुझं एज कंसिडर करून..."
"माझं वय कधीपासून प्रॉब्लेम देऊ लागलं? ...लूक! आय कॅन टेक केयर ऑफ मायसेल्फ! नो नीड फॉर युअर कन्सर्न", करणने थोड्या गुश्श्यातच म्हटलं.
"कन्सर्न! आय बेट यू नो एनिथिंग अबाऊट अवर कन्सर्न! गेल्याच वर्षी, त्या क्षुल्लक नटीचा पिक्चर बघायला तू तुझं रक्त सांडलंस आणि त्यावर बोलतोस नो नीड फॉर कन्सर्न?"
"ती क्षुल्लक नाहीये. शी इज माय गॉड!"
"ती फडतूस ऍक्ट्रेस्स तुझी गॉड? तुझ्या आई वडिलांना सोडून, कोण ती काय, तुला कधीपासून वंदनिय झाली?"
"समीर दादा मेनका फडतूस नाहिये. आपलं ह्यावर आधीच भांडण झालय.", करणने आवाज चढवला.
"हो माझ्याशी, तुझ्या आईशी, मित्रांशी आणि इण्टरनेट वर कुठल्यातरी वाया गेलेल्या पोरांशी. सगळ्यांशी तुझं भांडण झालयं. सगळे मेनकाच्या जीवावरच जसे उठलेत! आणि तुलाच तिची फिकर जास्त. नाही का?" समीरने मग रागात उपहासाचा सूर पकडला.
"हो तुम्ही सगळेच आहात तिच्या विरूद्ध! मला तर त्या ब्लॅकवल्चर पेक्षा आज तुझाच राग जास्त आलाय. मला वाटलेलं तू तरी मला समजत असशील. बट आय वॉज सो रॉन्ग! तुलाही तिचाच प्रॉब्लेम.", करण दातओठ खात म्हणाला, "आय हेट यू!"
"काय? दॅट्स रिडिक्युलस! मी तुझा भाऊ असून यू हेट मी फॉर दॅट होर्र?", समीरने मेनकाला शिवी दिली तसंच करणचे डोळे रागाने लाल झाले. तो जळजळीत नजरेनं समीरकडे पाहू लागला... "नजर खाली कर ती. डॊण्ड लूक ऍट मी लाईक दॅट! मी आजही तुझा मोठा भाऊ आहे हे विसरू नकोस.", समीरने मग करणला दम दिला.
"तू माझा भाऊ असशील बट यू आर नॉट माय फादर. सो यू स्टॉप बिईंग वन!!!", करणने आपला रीस्टबॅण्ड काढून समीरकडे रागात फेकला, "आय स्टील हेट यू!", असं म्हणून करण रागात बाजूच्या बॉक्सिंग बॅगला एक पंच मारून निघून गेला.
समीरने रागातच पण हताशपणे करणच्या निघून गेलेलेया पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तो मागल्या वर्षी दिलेला नायकीचा फ्रेण्ड्शीप रीस्टबॅण्ड उचलला...
.... करणने रागात फेकलेल्या त्यावरचा एक धागा समीरला उसवलेला दिसत होता...
भाग सहा:
वाऱ्याला चिरत करणची सायकल भरदाव चालली होती. समीरशी फारकत घेऊन करण निघाला होता खरा पण कुठे आपण जातोय ह्याचे त्याला भानच राहिले नव्हते. आज समीरदादाने मेनकाला दिलेल्या शिव्या त्याच्या जिव्हारी लागल्या होत्या. मनात तापाचा, रागाचा अन कुठेतरी दुःखाचा कल्लोळ माजला होता... "आय हेट हिम!" हेच शब्द मनात बराळत करणने सायकल तीव्रगतीत हाकली होती. ह्याच विचारांत त्याला उजवीकडच्या वळणावर येणारी गाडीही दिसली नाही.
जोरात ब्रेक लागले, पण जरा ऊशीराच. करण गाडीच्या बोनेटशी आदळला अन खाली पडला...
"ओह माय गॉड!", कुणीतरी किंचाळलं, अन गाडी मधून बाहेर येऊन खाली पडलेल्या करणच्या चेहेऱ्यासमोर येऊन बघू लागलं. करणचा चश्मा फुटला होता. पण त्यापेक्षाही त्याच्या उजव्या बाहीत असह्य कळ उठली होती, त्यामुळे त्याच्या डॊळ्यासमोर अंधारी आली असावी... पण त्याही गोंधळात कुणीतरी "करण करण!" अशी हाक मारत असल्याचं करणला जाणवलं अन तो डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. पण अर्ध्या अंधारात अन त्यातून फाकलेल्या गाडीच्या तीव्र प्रकाशाच्या आडून येणारी ती आकृती कोण हे करणला समजले नाही. नाहीतरी एव्हाना करणची शुद्ध पूर्णपणे हरपली होतीच....
"आय थिंग ही इज गेटींग कॉन्शस!... करण कॅन यू हियर मी?"
करणने डॊळे किलकिले केले.
समोर करणचे फॅमिली डॉक्टर डॉ. श्रीनिवास करणकडे वाकून पाहत विचारत होते.
करणने सभोवार नजर फिरवली. डॉक्टरांच्या सोबत आई होती, सॅवियो होता. उजवीकडे पूजा अन तिच्यासोबत कुणीतरी एक अनोळखी मनुष्य होता. आईचे डोळे रडल्यासारखे होते.
"करण बाळा कसा आहेस?", आईने करणला कवेत घेतलं. करणला थोडं कुठेतरी दुखलं.
"आह!", करण कळवळला तसं डॉक्टरांनी आईला बाजूला केलं.
"काय झालं? आई मी इथे...", करण विचारत होता
"यू आर ओके!", डॉक्टर म्हणाले, "छोटा ऍक्सिडण्ड झालाय. बस्स! उजवा हात फ्रॅक्चर आहे. आता महिनाभर विश्रांती!"
करणने उजव्या हाताकडे बघितलं. पांढरशुभ्र प्लास्टर बांधल्याने तो जड हात अगदी निपचित पडून होता.
"आता विश्रांती घे! उद्या क्लिनिकमधून डिस्जार्ज मिळेल... आता मी डॉक्टरांशी इतर फॉर्मालिटीज करून घेते.", आईनं उसनं हसून आणत म्हटलं, "आणि थॅन्क्स टू पूजा. तिच्याच गाडीशी तू आदळलास. तिनं आम्हाला फोन केला अन तुला इथे आणलं.", असं म्हणून आईने पूजाकडे कृतज्ञतेने एक कटाक्ष टाकला अन ती निघून गेली.
करण दोन मिनिटं स्तब्ध होऊन पूजाकडे पाहू लागला. अधूनमधून त्याची नजर तिच्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे जात होती.
"थॅन्क्स!", करणने पूजाला म्हटलं पण त्याचं खरं लक्ष मागल्या माणसाकडे गौतम दोशीकडे लागून राहिलं होतं.
"यू आर वेलकम. अरे डिनर वरून मी गौतम अंकलच्या गाडीतून घरी येत होते आणि एका वळणावर तू गाडीशी आदळलास. कित्ती घाबरलेच मी! नंतर पाहिलं तर तू. आदळून बेशुद्ध झालेलास. मग मी आणि गौतम अंकलनी तुझ्या घरी फोन केला अन त्यांच्या सांगण्यावरून तुला इथे आणलं. ओह ऍण्ड बाय द वे, धिस इज मि. गौतम दोशी! अंकल धिस इज करण, मी तुम्हाला सांगितलेलं दॅट मेनका फॅन!", पूजाने हसत दोघांची ओळख करून दिली.
गौतम दोशीने करणच्या डाव्या हाताशी हॅण्डशेक केला.
"गौतम दोशी!!" करण हडबडला. चाळीशीतला, मध्यम बांधा असलेला, गहूवर्णीय, उंच अन फ्रेन्च दाढी असं मोजकंच रूप असलेला तो इसम म्हणजे ह्या साऱ्या कोड्याचा सूत्रधार! करणला विश्वासच बसत नव्हता.
"हाऊ यू फिलिन?", अगदी अमेरिकन ऍक्सेण्ट मध्ये गौतम अंकल म्हणाले.
"फाईन!", अजूनही आपण प्रत्यक्ष मेनकच्या एक्स-बॉयफ्रेण्ड गौतम दोशीला पाहतोय ह्याचा त्याला विश्वासच बसत नव्हता.
"वेल फाइन देन! मला वाटलं तुला भरपूर लागलं की काय. तशी कार ३० च्या स्पिडनेच येत होती.", त्यांचं मराठी ऎकून करणला थोडा धक्कच बसला असावा. कारण त्यावर करणने तोंड उघडं ठेवलं होतं. पूजा म्हणाली, "हो गौतम अंकल इकडचेच आहेत मुळात. त्यांन मराठी छान येतं."
करणने थोडक्यात पूजाकडे स्तिमित नजरेनं पाहिलं अन तो पुन्हा गौतम अंकलकडे पाहू लागला.
"हो तुमची गाडी ३० ने येत होती. माझी सायकलच त्यापेक्षा फास्ट असावी...", करणने ओशाळत म्हटले, "..शिवाय मीच नो एण्ट्रीत घुसलो. आय ऍम सो सॉरी!"
"नो प्रोब्लेम सन.", गौतम अंकल समजवणुकीच्या स्वरात म्हणाले, "इट हॅपन्स समटाईम्स. वेल यू टेक केयर नाऊ, आय थिन पूजा कॅन मॅनेज गोईंन होम ऑल बाय हरसेल्फ. इट्स नाईन थर्टी!", अंकलनी पूजाला इशारा केला तशी पूजाने पर्स उचलली.
"ओके करण बाय! टेक केयर. मी उद्या येईन. मला काही गोष्टी सांगायच्यात", असं म्हणून पूजाने गौतम अंकलकडे पाहिलं. गौतम अंकलनी मंद स्मित केलं अन करणला बाय करून ते निघून गेले. पूजाही त्यांच्या मागोमाग निघून गेली.
"काय बिडू? मेनकाच्या नादात हात पण मोडलास? म्हणजे याधी रक्त सांडलंस ते ठिक होतं. ", सॅवियोने बाजूची खुर्ची सरकावली अन त्यावर बसत त्याने नेहेमीची लुख्खागिरी सुरू केली.
करण फक्त हसला पण काहीतरी समजल्यागत म्हणाला, "पण तुला कसं कळलं की हे सगळं मेनकामुळे...", अन मग एक दीर्घ उसासा घेतला. त्याच्या चेहेऱ्यावर राग दिसू लागला, "समीरने सांगितलं? हो ना? म्हणजे त्याने आईलाही चोमडेपणा केला असेल."
सॅवियो काहीही बोलला नाही पण थोडावेळ गप्प बसून न रहावून म्हणाला, "अरे पण समीरदादाची काय चूक?"
"काय चूक? हे बघ तो माझा भाऊ नाहिये. त्याने भावाभावांतली मित्रत्वाची हद्द ओलांडली आहे, मेनकाला फडतूस आणि होर्र बोलून."
"कमॉन करण! आपणही स्कूलमध्ये कित्येक मॅडम्सना अन वाया गेलेल्या मुलींच्या नावाने स्वेयर करतोसच ना?"
"पण त्यांना आपण ओळखतो. त्यांच्याशी आपली खुन्नस असते. समीर मेनकाला ओळखत नाही, तरीही इतकं पर्सनल होऊन त्याने शिव्या द्याव्यात. मी कधी त्याच्या कुठल्या नेव्ही कलीगला किंवा ल्युटिनण्ट देशपाण्डेंना पर्सनल शिव्या दिल्यात?"
करणच्या ह्या प्रश्नावर सॅवियो निरुत्तर झाला.
"पण शेवटी चुका होतातच ना रे! भाऊच आहे ना तो!"
"हो भाऊ आहे म्हणून मी काही जास्त बोल्लो नाही आणि तू म्हणतोयस तसा मोठाच भाऊ आहे तो, ही इज नॉट माय मदर ऑर फादर. लहान भाऊ म्हणून मी त्याचा दम का ऎकून घेऊ?"
"मग मोठा भाऊ म्हणून माफ तरी कर ना..."
करणने सॅवियोकडे थोड्या गुश्यात संशयाने बघितलं, "पण तू का समीरची इतकी तरफदारी करतोयस?"
सॅवियो थोडा सावध झाला, "तसं नाही रे. मी म्हणजे तुमच्यात जमावं म्हणून. अजून काही नाही", असं म्हणून त्याने संवाद गुंडाळला.
पुढचे काही क्षण ‘काय बोलू?’ हे शोधण्यातच गेले. शेवटी सॅवियोने निळं मार्कर काढलं.
"बिफोर आय गो, इट्स टाईम फॉर गेट वेल प्लास्टर विशेस!", असं म्हणून त्याने मिस सोलंकीचं ओळखीचं कार्टून करनच्या उजव्या हाताच्या प्लास्टर वर काढलं अन तिच्या हाती अभ्यास न केला म्हणून पट़्टी खाणाऱ्या काढलं अन तिच्या हाती अभ्यास न केला म्हणून पट़्टी खाणाऱ्या स्वतःचंही एक कॅरीकेचर त्याखाली काढलं अन एक कमेण्ट लिहिली.... "सोलंकी मॅम, अहो करणचा ऍक्सिडेण्ट झाला म्हणून विशेस लिहित होतो... त्यातच ऊशीर झाला मग होमवर्क राहिला..."
कार्टूनमधल्या सोलंकी मिसचा चश्मा डोळ्यांरून काढलेला होता अन कपाळावरच्या आठ्या कपाळात मावत नव्हत्या.
"सो व्हॉट यू से? तू इथे असेपर्यंत मला अभ्यास न करण्याचा बहाणा मिळालाच.", सॅवियो हसला. करणनेही मग हसून दाखवलं अन त्या हलक्या फुलक्या मस्तीने दोघे सुखावले. सॅवियोने बाय केलं अन तो निघून गेला. सॅवियो सारखा मित्र असणे कदाचित त्यावेळी करणसाठी सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट होती.
सॅवियो हॉस्पिटल वॉर्ड मधून बाहेर पडताच समोर समीर दिसला. सॅवियोने हताशपणे समीरच्या समोर जाऊन खांदे पाडले.
"मी त्याला सांगायचा बराच प्रयत्न केला. पण तो भरपूर भडकलाय. काहीच एकून घेत नाही."
"नो प्रॉब्लेम सॅवियो. तू तुला जमेल तवढं ट्राय केलंस ना. तेवढच पुष्कळ आहे. थॅन्क्स एनिवेज़.", समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं. सॅवियोने डोळ्यांतल्या डोळ्यांत सॉरी म्हणून समीरचा निरोप घेतला.
समीर हळूच हॉस्पिटल वॉर्डच्या अर्धवट काचेच्या दाराकडे जाऊन पडद्याड करणकडे पाहू लागला. करणने बिछान्यावर डावी बाजू घेतली होती. त्यामुळे त्याचा चेहेरा दिसत नव्हता. पण तो जागाच असावा. त्याचे तळपाय हलत होते. करण चिंताक्रांत किंवा रागात असे तेव्हाच त्याचे पाय असे हलत असत. समीरने तिथूनच माघार घेतली.
समोरून आई येत होती.
"भेटलास?"
"नाही."
"का?"
"पुन्हा रागावून काहीतरी करून बसायचा."
"पण ही वेळ येऊ द्यायचीच का? मी तुला त्याच्याशी बोल असं सांगितलं ते काय ह्याच्यासाठी?"
"अगं सगळं नीट जमेल असं मला वाटलं होतं."
"समीर विचार कर जर तो आत्तच असा वागू लागला तर त्याला खरं काय ते सांगायची वेळ येईल तेव्हा तो कसा रिऍक्ट करेल? मी त्याची आई नाहीये असं जर त्याला..."
समीरने चिंतीत डोळ्यांनी आईकडे पाहिलं. आज तेरा चौदा वर्षांनी हे गुपित प्रत्यक्षात बोललं गेलं होतं. त्याच्या विचारानेच समीरचं हृदय धडधडू लागलं. आईनेही तिचं वाक्य मध्येच गिळलं.
"आता काय करायचा विचार आहे?", आईने पृच्छा केली.
"तू काहीतरी करू शकशील का?"
"बघेन. त्याचा मोडलेला हात पाहूनच मला कसंसंच होतं. नाही बघू शकत रे मी त्याला अशी. नाही झाला तरी माझाच वंश आहे ना तो."
समीरलाही मग पाझर फुटला. त्याने रडून आईकडे मन हलकं करून घेतलं.
मग आजचा दिवस असाच जाऊ द्यावा हे दोघांमते ठरलं.
*********************************
भाग सात:
आजची करणची सकाळ उल्हासित होती. कारण पूजा त्याला भेटायला आली होती.
"कसं सगळं अचानक घडलं ना?", पूजाने भुवया उडवत म्हटलं, "म्हणजे सकाळीच मी तुला बॉलिंग ऍलीत भेटले अन संध्याकाळी तू हॉस्पिटलात. माझ्याच गाडीपुढे येऊन. इट्स वियर्ड."
करणही हसला, "हो वियर्ड! दॅट वॉज सम सन्डे!"
पूजा हसली अन दोघे गप्प झाले. अजूनही त्या दोघांना बोलायला काहीतरी शोधणं मुश्किल जात होतं. प्रत्येक दोन तीन डायलॉग्स नंतर चांगला दोन तीन मिनिटांचा पॉज असे.
"काय केलंस काल बोलिंग ऍलीतून निघून?", पूजाने प्रश्न केला.
"काहीनाही. घरी गेलो अन तिथे आईकडून कळलं दानिश शहाने नवं मॅगझिन आणलेलं फिल्मफेयरचं. त्याला भेटायला गेलो. तिथून मग जीममध्ये, त्यानंतर...", करणला त्यानंतरचा किस्सा आठवला अन पुन्हा त्याचं तोंड कडू झालं. पुढचं कसं सांगू हे कळेना. म्हणून तो मग गप्प बसला, "मॅगझिनमध्ये मेनकाचा इण्टरव्हू छापून आलाय." त्याने संभाषणाचा बाज बदलला.
"खरंच?", पूजाने विचारले, "काय गॉसिप छापलंय यावेळेस?"
"काही नाही नेहेमीचच. बट थोडं सेन्टीमेण्टल कव्हरेज आहे यंदा."
"म्हणजे?", पूजाने विचारलं तसं करणने तिला पान सात दाखवलं.
पूजा काही वेळ तो इण्टरह्यू वाचत होती. तिलाही तो थोडा इमोशनल वाटलाच. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव सांगत होते.
"सॅड!", पूजाने म्हटले, "बाय द वे मी तुला ह्या अवस्थेत सांगणार नव्हते पण मला वाटतं यू कॅन हॅण्डल इट."
करण गोंधळला. पूजा पुढे म्हणाली, "काल बॉलिंग ऍलीत ठरल्याप्रमाणे मी गौतम अंकलकडून मेनकाविषयी थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला..."
करणने कान टवकारले. तो उत्साहित झाला, "..आणि?"
"आणि मला त्यांनी सांगितलं की ते आणि मेनका चांगले दोस्त आहेत. मेनका स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस्स होती तेव्हाची गोष्ट. तिला पहिला पिक्चर मिळाला अन त्यासोबत तिने आणखी तीन चित्रपट साईन केले. पहिल्या चित्रपटात ती एवढी बिझी झाली की मग दोघे कामानिमित्त खूप क्वचित एकमेकांना भेटू लागले. मग दोशी अंकलनी पुढाकार घेऊन मेनकाला लग्नाची मागणी होती."
"मग?", करण एक्साईट झाला होता... "काय केलं तिनं?"
पूजाने पॉज घेतला, "हह्ह!", पूजा उपरोधिक हसली, "साहाजिकच नाही म्हटलं."
"का?"
"कारण सांगितलं नाही. पण एवढं मात्र म्हणाली की ती त्यांच्या लायकीची नाही."
"?", करणच्या चेहेऱ्यावर मोठा ‘का?’ उमटला होता
"अंकलनी तिला विचारायचे प्रयत्न केले पण ती काहीच म्हणाली नाही. फक्त रडत होती."
"मग?"
"मग तिला लग्नात इन्टरेस्ट नाहीये म्हटल्यावर पुढची मैत्रीही एकत्र राहून सांभाळणे अवघड ठरणार होतं. पुन्हा गौतम अंकलना यूएसला जायचं होतं. म्हणून मग ते वेगळे झाले. टेलिफोनी व्हायची अधून मधून. बहुदा अंकलच करायचे. पण मागल्या महिन्यात तिनंच अंकलना फोन केला अन काहीतरी सांगायचंय म्हणून म्हणाली. अंकल नाहीतरी इंडियाला येणार होते मागल्या आठवड्यात. येऊन तिला भेटले. पण मिटींग मध्ये पुन्हा रडत होती. तशीच..."
करणला वाईट वाटू लागलं होतं
"पण ह्याखेपेस कारण सांगितलं", पूजाने करणकडे दुःखी डॊळ्यांनी पाहत म्हटले
करण उत्तराच्या अपेक्षेत होताच.
"गर्भाशयाचा कॅन्सर आहे तिला. म्हणून यूटेरस काढून टाकलंय!"
"व्हॉट़्ट!", करणला मोठ्ठा धक्का लागला, त्याने ओठंवर हात ठेवला, "आर यू श्युर!"
"हो!", पूजाही अस्वस्थ झाली, "अंकलना खूप वाईट वाटलं. सारखी बोलत होती, ‘मी कधी आई होऊ शकणार नाही’ म्हणून. सारखी रडत होती."
"ओह माय गॉड!", करणचे डॊळेही पाणावले.
"कुणाला सांगू नकोस हे.", पूजाने करणच्या हातावर हात ठेवला, "प्रॉमिस!"
करणने दीर्घ उसासा गेतला. ही खरोखरच वाईट बातमी होती. पण ह्याची वाच्यता करून मेनकाला आणखी त्रास देण्यात काहीही अर्थ नाही हे त्याने जाणले. त्याने पूजाच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलावली.
"शी इज ओके नाऊ. तिच्या जीवाला तसा काही धोका नाहीय. पण फक्त एवढीच ट्रॅजेडी...", पूजाने म्हटलं अन ती गप्प बसली. अजूनही तिचा हात करणच्या हातावर होता.
दोन मिनिटं दोघे हातात हात घालूनच बसले होते. त्यांच्या ऊशीरा लक्षात आलं अन पूजाने ओशळून हात दूर सारला...
"माहितीये?", काहीतरी ऑफटॉपिक व्हावं म्हणून मग पूजाच म्हणाली, "कालपासून पासून शाळेत तुझ्याच बाता चाल्ल्यात. नव्या नव्या रूमर्स उठल्यात."
करणनं त्यावर चमकून पाहिलं, "म्हणजे?"
"म्हणजे कुणीतरी म्हणत होतं की तुला अचानक मेनका दिसली गाडीतून जाताना म्हणून तू तिचा पाठलाग करत होतास. दानिश शाह म्हणत होता की तिच्या नव्या मॅगझिनमधला फोटो तुला आवडला नाही म्हणून तू रागावून सायकल चालवत होतास. सोलंकी मिसनं मलाच गाठलं अन विचारलं ‘इज इट ट्रु दॅट करन वॉज फॉलॉईंग यू? बट ही इज सच ग गुड बॉय. व्हाय वुड ही डू सच थिंग?"
करण थोडा घाबरलाच, "काय म्हणालीस? खरं?"
"हो रे! पण जस्ट रूमर्स...", पूजाने हसत मान थोडक्यात झटकली, "मलाही तसं नक्की काय झालं होतं माहित नाही. म्हणून मीही सगळ्यांना खरं काय ते सांगू शकले नाही... पण ... करण ... नक्की ... काय झालेलं रे?", पूजाने खाली बघत मोबाईलशी चाळे करत धीर एकवटून विचारलं.
करण गप्प झाला, "तुझं समीरशी बोलणं झालयं वाटतं ... का खरंच तुला माहिती नाहिये?"
त्यावर पूजा डिफेन्सिव झाली, "नाही रे काहीच माहित नाहिये. खरंच. फक्त तुझं अन समीरदादाचं भांडण झालेलं एवढंच...",पूजाने करणकडे पाहिलं, करण थोडा रागवलेला दिसत होता. त्यावर पुन्हा पूजा म्हणाली, "म्हणजे मला सॅवियोने सांगितलं."
करण गप्पच होता. त्याने मान खाली घातली.
"म्हणजे मीच त्याला विचारलं, त्यानं गॉसिप केलं नाही माझ्याकडे", पूजाने स्पष्टीकरण केले.
करण शांत झाला अन म्हणाला, "मग त्याने कारणही सांगितलं असेलच."
पूजाने फक्त होकारार्थी मान डोलावली, "बट करण..."
"हे बघ", करण तिची बाजू सुरू न करू देतच म्हणाला, "जे काही आहे ते माझ्यात अन समीरदादात आहे. ते आम्ही बघू. तुला अन सॅवियोला त्रास करून घ्यायची गरज नाहीये."
पूजा हिरमुसली. करणला आपण जास्त अगतिक झाल्याचं कळलं अन तो मग स्वतःच डिफेन्सिव झाला, "सिरियसली इट इजण्ट अ बिग डील! आय मीन तुम्ही उगाच त्रास का करून घेताय?"
"बिग डील नाही मग समीरदादाशी दोन दिवसांपासून बोलला का नाहीस?", पूजाने लगेच प्रतिप्रश्न केला.
यावर करण पुन्हा गप्प झाला, "चूक त्याची आहे."
"पण सॉरी म्हणतोय ना तो"
"कधी म्हणाला? माझ्या रूममध्येही आला नाहीय तो अजून. तेवढीही त्याच्यात सेन्सिबिलिटी नाहीय.", करण रागात बोलला.
"असं? मग हे प्लास्टर वर काय आहे तुझ्या?", पूजाने दर्शवलं तसं करण उजव्या हाताच्या प्लास्टर वर बघू लागला.
सारं प्लास्टर लाल स्केचपेनने लिहिलेल्या "सॉरी! प्लीज फर्गिव मी!" च्या विनंतीनं भरलं होतं!
करण दोन मिनिटं गहिवरला. सकाळी उठल्यापासून त्यानं प्लास्टर पाहिलंच नव्हतं.
"बघ! ही इज जेन्युईनली कन्सर्न्ड.", पूजा म्हणाली, "ही अडमिट्स हीज मिस्टेक"
पण करण विरघळला नव्हता, "जोपर्यंत तो पर्सनली सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी त्याला माफ करणार नाही..."
तेवढ्यातच "...सॉरी!" असं कुणीतरी म्हणालं. पूजा अन करण दाराकडे पाहू लागले.
हा समीर होता.
"सॉरी!", समीरने पुन्हा म्हटले, "इट वॉज माय मिस्टेक!", समीरला त्याचक्षणी धरणीनं पोटात घ्यावं एवढं वाईट वाटत होतं. करणच्या डॊळ्यांत बघायची त्याला हिम्म्त होत नव्हती.
पूर्ण रूम गप्प झाली. पूजाने आता, करण काय बोलतोय हे पाहण्यासाठी, त्याच्याकडे पाहिलं. करण त्याचं प्लास्टर डाव्या बोटांनी कोरत होता. त्याचे पाय अंथरूणातच हलू लागले होते. मनात भावनांचा कल्लोळ पुन्हा माजला असावा.
समीरने पूजाकडे पाहिलं. पूजा समजली.
"लूक! तो आला अन त्याने सॉरीही म्हटलं आता. आता तरी भांडण संपवना."
"नाही", करण समीरकडे न बघता म्हणाला, "मी बरंच काही ऎकून घेतलंय. मला वेळ लागेल."
"अरे भावाला माफ करायला कसला वेळ? थोडा विचार कर.", पूजाने प्रश्न केला.
"भांडण त्याने वेळ पाहून किंवा विचार करून केलं नाही. मग मी का विचार करू?", करणने हट़्ट सोडला नाही, "कुणाला अजून काही बोलायचं असेल तर ठिक अदरवाईस ऑल कॅन गो!"
रागाच्या भरात आपण त्या सर्वांमध्ये पूजा प्रधानलाही जायला सांगितल्याचे करणला ऊशीराच ध्यानात आले.
खोलीत बराच अवघडलेला पणा जाणवायला लागला होता. समीरनं तिथून जाणं अत्यावश्यक होतं.
समीरनं हे जाणलं अन चुकल्यासारखा चेहेरा करून तो परतला. इकडच्यापेक्षा इतर कुठतरी आज दिवस घालवावा असं वाटून त्याने आईला सांगून ऑफिसची वाट धरली.
इकडे पूजानेही बॅग उचलली, "बाय देन!"
करण गप्पच होता. पूजा दारापर्यंत गेली. करणला राहवले गेले नाही.
"पूजा!", करण ओरडला, "सॉरी! मला तुला जायला सांगायचा माझा अजिबात मानस नव्हता."
पूजा वळली, "इट्स ओके! नाहीतरी ऊशीर झाला आहे. मी निघायला हवं, स्कूलला जायंचय."
"मग पुन्हा कधी येशील?", करणने अजीजीनं विचारलं, "आज जरा ऑकवर्डच सिच्युएशन झाली इथे."
"येईन ना ऊद्या. ओह बाय द वे!", असं म्हणून ती बॅगेत काहीतरी शोधू लागली, "हे दोशी अंकलनी मला त्यांचे जुने फोटोग्राफ्स दिलेत. मेनकाबरोबरचे. काही इन्टरेस्टींग गोष्टीही सांगितल्यात. त्या नंतर सांगीन. आता निघायला हवं." असं म्हणून तिनं बॅग्तून एक आल्बम काढून करणच्या हवाली केला अन ती निघून गेली.
पूजाने सोबत आणलेला सकाळचा आनंद ती जणू परत स्वतःबरोबर घेऊन गेली असावी.
कारण ती गेल्यावर रूम पुन्हा भकास दिसू लागली होती.
******************************
भाग आठ
आज हॉस्पिटलातून डिस्चार्ज व्हायची वेळ आली. आईने सगळी आवरावर केलेली. करण प्लास्टर केलेला उजवा हात गळ्यात अडकवून जायला तयार झाला होता. सॅवियोने खास करणसाठी आज शाळेतून अर्धा दिवस सुट़्टी घेतली होती. समीरसुद्धा आज ऑफिसात जाणार नव्हता.
"घेतलंस ना सगळं?", आईने समीरला शेवटचा प्रश्न केला, सामान उचलण्यात गुंतलेला समीर "हो" एवढच मोजकं बोलून बाहेर निघून गेला. करणच्या खोलीत त्यापेक्षा जास्त बोलायची समीरला जणू मनाईच होती. तिथे बाहेर सॅवियो समीरनं आणून दिलेलं सामान गाडीत हलवित होता. अन इथे डॉ. श्रिनिवास करणचं शेवटचं इन्स्पेक्शन करत होते.
"ओके आता पुढे तीन आठवडे ऑर्थोपेडिक मेडिसिन्स आणि व्यायाम करायला लागेल. दुखेलही अधून मधून पण इलाज नाही."
करणच्या चेहेऱ्यावर चिंतेचे भाव दिसू लागले.
"म्हणजे ऍक्सिडण्डमध्ये दुखलं तेवढं दुखणार नाही.", डॉक्टर करणला आश्वस्त करत म्हणाले, "डॊण्ड वर्री!".
"श्युर!", असं हळूच म्हणून करणने डोळे फिरवले, "दॅट हेल्प्स!!!".
करणने उपहास केला तसे आईने करणकडे मोठ्या डोळ्यांनी बघत त्याला तंबी दिली.
"लूक करण! व्यायामाशिवाय पर्याय नाही. अजून एक आठवडा तरी व्यायाम करायचा नाहीये. फक्त मेडिसिन्स घ्यायचीत. त्यानंतर तू शाळेत जाऊ शकतोस. बस्स आणखी तीन आठवडे आणि पुढच्या आठवड्यात प्लास्टर तर निघेलच. ", डॉक्टर म्हणाले.
तेवढ्यावर सुटकेचा निश्वास टाकून करणने मान डोलावली. डॉक्टर निघाले तसं करणही जॅकेट घालून जायला तयार झाला. ह्या डिप्रेसिंग हॉस्पिटलमधून मधून कधी घरी जातोय असं त्याला झालं होतं.
"ओके. लेट्स गो!", समीरने रूमच्या बाहेरूनच हाक दिली. सगळे हॉस्पिटलच्या बाहेर आले अन गाडीपाशी थांबले. सॅवियो अजूनही डीक्कीत सामानची मांडणी करत होता. करण आला तसं समीरने कारचं पुढचं दार त्याच्यासाठी उघडलं. करणने समीरकडे न बघताच मागचं दार डाव्या हातने स्वतःच उघडलं अन तो मागच्या सीटवर जाऊन बसला. समीर हिरमुसला अन त्याने आईला पुढे बसायला सांगितलं. सॅवियोनेही करणच्या सोबत मागे बसणे पसंत केले. १० मिनिटं कार मध्ये शांतताच होती.
"दानिश शाह तुझी आठवण काढतोय", सॅवियोने कोंडी फोडली.
"का?", करणने विचारलं.
"फ्री होमवर्क...", असं तो म्हटला अन तोच आपण करणच्या फॅमिलीसोबत बसलोय हे सॅवियोच्या ध्यानात आलं. त्याने जीभ दातांखाली दाबली, "आय मीन त्याला तू होमवर्कमध्ये हेल्प करणार होतास ना त्याबद्दल..."
करणने उसासा टाकला, "अरे आता माझीच वाट लागलीय होमवर्कची. उजवा हात मोडलाय. लिहिणार कसं?"
"मी हेल्प करीन", सॅवियोने लगेच म्हटले, "त्यात माझाच फायदा आहे. मलाही तुझा होमवर्क कॉपी करायला मिळेलच ना...", सॅवियोच्या चेहेऱ्यावर मिश्किलीची नांदी होती.
"सॅवियो!", करण चकित झाला, "तू प्रत्येक दिवशी माझा अन तुझा असा दोनदा होमवर्क लिहिणार? बरायस ना? तुझे एकदाच होमवर्कचे वांधे होतात...", करणने भुवया उंचावल्या.
"हाहा", सॅवियोने खॊटं हसून दाखवलं, "डोण्ट गेट विकेड ओके! एरवी होमवर्क सोबत सोलंकी मिसचे पनिशमेण्ट सम्स करतोच ना मी. तोही डबल होमवर्कच असतो एका प्रकारे!", सॅवियोने म्हटलं तसं गाडीत थोडं हास्य पसरलं. कार चालवत समीरही गालातल्या गालात हसला.
"ओह! बाय द वे! सोलंकी मिस काल तुझ्याविषयी मला विचारत होत्या.", सॅवियोने आणखी एक अजब गोष्ट सांगितली, "कधी नव्हे ते माझ्याशी नॉर्मल टोनमध्ये बोलल्या."
"काय म्हणतोस?"
"मग काय! आणि आजकल आणखी एक गोष्ट ऑब्झर्व केलीय मी... त्यांच्या कपाळावर तेवढ्या आठ्या नाहीयेत जेवढ्या मी कार्टून मध्ये काढतो..."
सोलंकी मिस अन सॅवियो ह्या टॉम ऍण्ड जेरी जोडीचं अचानक कसं काय जमलं हेच कितीतरी वेळ करण स्वतःला पुसत होता...
त्याचं उत्तर शोधेपर्यंत घर आलंही.
"आई तू जाऊन दार उघड मी सामान आणतो", समीरने आईला सांगितलं अन उतरून करणच्या बाजूचं कारचं मागचं दार उघडलं. पण करण सॅवियोसोबत दुसऱ्या दाराने उतरला.
समीरने थोड्या रागातच स्वतः उघडलेलं दार आपटलं अन डीक्की उघडून दोन बॅगा खांद्यावर घातल्या. करणसाठी न थांबता तो घरात गेला अन करणच्या खोलीत जाऊन त्याचं सामन ठेवून स्वतःच्या रूममध्ये जाऊन दार बंद करून बसला.
आई आल्या-आल्या किचनमध्ये घुसली. सॅवियो अन करण त्याच्या खोलीकडे आले अन सॅवियोने करणसाठी दार उघडले.
करण थोडा विमनस्क स्थितीतच त्याच्या अंधाऱ्या खोलीत शिरला. मागे उभ्या सॅवियोने दिवे लावले अन तो ओरडला... "सप्राईज!"
भोवताली बघत दोन मिनिटं करण स्तब्ध उभा राहिला होता...
त्याच्या खोलीला नवा रंग दिला होता. अन साऱ्या भिंतींवर मेनकाचे नवे पोस्टर्स अन कोलाज कोरलेले होते. एवढच नाही तर खिडकींवरचे पडदेही मेनकाच्या फोटोंनी एम्बॉस केलेले होते...
"काय मग! आहे ना नाईस सप्राईज?"
"हे थॅक्स!", करणचा चेहेरा उजळला होता.
"मला कशाला थॅन्क करतोयस? समीरला कर... त्याचीच आयडिया होती ही."
ते एकल्यावर करणचा चेहेऱ्यवरचा आनंद मावळला. पुन्हा रागिट चेहेऱ्याने म्हणाला, "म्हणजे माफ कारण्यासाठी मला ब्राईबच देतोय तो असं म्हण ना?"
सॅवियोने ‘च्च!’ केलं. "काय रे करण! तुझा प्लास्टर सांगतंय की त्याने तुला आधीच सॉरी म्हटलंय. पूजाही सांगत होती परवा की त्याने रूममध्ये येऊन तुझ्या समोर तुझी माफी मागितली. अन इकडे रूमचं री-डिकॉर पण तीन दिवसात करवून घेतलं. एवढं कुठला भाऊ करेल?"
"हे बघ सॅवियो! तू समीरची बाजू घेणं बंद कर. मला जेव्हा वाटेल दॅट ही इज ट्रूली सॉरी तेव्हाच मी त्याला माफ करीन."
"ट्रूली सॉरी? ह्ह!", सॅवियो म्हणाला, "लूक अराऊण्ड यू! एवढं तर आई बाबाही आपल्या मुलांसाठी करत नाहीत. स्टॉप बिईंग सो स्टबर्न करण. एनीवेज टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. तूही त्याला रागात काय काय बोल्लास ना? मग त्याने मोठा भाऊ म्हणून तुझं का ऎकून घ्यायचं? मीही क्रिस्टलचा मोठा भाऊ आहे. ती कधी माझ्याशी अशी वागली तर आय विल गिव हर अ डॅम्न!", करण रागातच गप्प होता, "समीर हॅज अ बिग हार्ट टू डू ऑल धिस फॉर अ स्टुपिड फाईट!", सॅवियोला करणचा राग पटत नव्हता.
"स्टुपिड फाईट!", करणने आवाज चढवला, "आय नो व्हॉट्स हॅपनिंग हियर. हे सगळं सांगायला त्याने तुलाही ब्राईब दिलीय."
"ब्राईब! सो यू थिन्क आय टूक अ ब्राईब?", सॅवियो चिडला, "यू नो व्हॉट! आय ऍम राईट. यू आर स्टबर्न. नॉट ओन्ली स्टबर्न बट ऑल्सो रुड ऍण्ड सेल्फिश! यू डॊण्ट केयर फॉर युअर फॅमिली ऍण्ड फ्रेण्ड्स... आम्ही सगळे मूर्ख आहोत तुला एवढा भाव द्यायला. यू जस्ट केयर अबाऊट युअरसेल्फ. दुसऱ्यांचे इमोशन्स इज लाईक अ टॉय फॉर यू!"
"ओ याह? देन डोण्ट बी फ्रेण्ड्स विथ मी. गेट लॉस्ट फ्रॉम हियर!! आय डॊण्ट वॉण्ट टू सी यू!", करणने रागात दार उघडले अन सॅवियोला जायला सांगितलं
सॅवियो दोन मिनिटं जळजळीत नजरेने करणकडे बघत होता... "फाईन! गो टू हेल्ल!", असं म्हणून सॅवियो तणतणत घरातून निघून गेला. करणने रागात दार आपटले. दार आपटल्याचा प्रतिध्वनी कितीतरी वेळ त्यानंतर घरात घुमत होता...
किचनमध्ये काही सेकंद शांतता पसरली होती. आईने सगळं ऎकलं होतं...
समीरच्या रूमच्या दारावर टकटक झाली. ही आई होती.
"मला तर कळतच नाहीये ह्याचं काय करावं?"
"म्हणजे?", समीर, डॅन ब्राऊनच्या ‘डिजीटल फोर्ट्रेस’च्या पानांत घुसला होता.
"करण अन सॅवियो, भांडले."
समीरनं पुस्तकाचं पान शांतपणे उलटलं.
"मी काय बोल्ले ऎकलंस ना?", आईने थोडा आवाज चढवला.
"मग मी काय करू असं तुझं म्हणणं आहे?", समीरनं त्रासिक स्वरात विचारलं.
"भावासारखा वागून काही साध्य काही होणार नाही. जरा मोठ्यांच्या जबाबदारीने वाग."
समीरनं पुस्तक दूर सारलं. तो ऊशीला टेकून नीट बसला.
"अग पण मी आणखी काय करू?", समीर थोडा रागात दिसत होता, "मला काहीच कळत नाहीये. एकतर तूही मला मदत करत नाहीस."
"हा प्रोब्लेम तुझा अन त्याचा आहे. मी मध्ये पडणार नाही.", आईने स्पष्ट केलं, "तू माझा सख्खा मुलगा आहेस. मी तुला काय ते नीट सांगू शकते. त्याला समजावणं तुलाच करायचंय."
"पण...", समीरचा प्रश्न संपण्याधीच आई तिथून निघून गेली.
समीर हताशपणे उठला.
दारापाशी कुणीतरी आल्याचं करणला कळलं. त्याने दार उघडलं. समीरला समोर बघून करण मागे फिरला अन आत जाऊन कॉम्युटरसमोर बसून उगीच इथे तिथे माऊस क्लिक करू लागला. करणची मेनका-द-ड्रिमगल.कॉम वेबसाईट कॉम्प्युटरवर दिसत होती. समीर आत शिरला अन त्यानं सभोवताली बघितलं. करणची ही खॊली मागले दोन दिवस सजवताना बरीच उल्हासित वाटत होती. पण आज तिचा मूड काळवंडलेला होता. दोन दिवस केलेली मेहेनत फुकट गेलेली वाटत होती.
"मला तुझ्याशी बोलायचंय.", समीरने आज चार दिवसांनी पहिल्यांदाच पूर्ण वाक्य करणला उद्देशून म्हटलं होतं.
"मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही.", करणने सरळ आवाजात म्हटलं.
"मला तुझी माफी मागायचीय."
"मी विचार करून सांगेन!"
"करण! प्लीज", समीर करणच्या बाजूच्याच खुर्चीत बसला, "लूक! आय ऍम सो सॉर्री! आय नो आय ऍक्टेड लाईक अ जर्क! पण मी काहीतरी करू शकतो ज्याने तुला विश्वास होईल की आय ऍम सॉरी. लूक! मी खरोखरच ऍमबॅरेस्ड आहे. मी काय करू? तूच सांग!"
"मी काय सांगणार? मेनकाला शिव्या देताना तुला काही सुचलं नाही. आता मलाच विचारतोयस?"
"ओके. मग मी असं काही करू शकतो ज्याने तुला आनंद होईल. बघ मी ही रूमही त्यासाठीच सजवलीय. जस्ट फॉर यू!"
"इट्स नॉट अबाऊट धिस रूम. इट्स नॉट अबाऊट मी ऑर मेनका. इट्स अबाऊट यू ऍण्ड युअर फिलींग्स टू हर. तू तिला काय काय बोल्लास. त्या फाईटचे कॉसिक्वेन्सेस..." असं म्हणून करणच्या डोळ्यांत पाणी तराळलं, " माझा उजवा हात तुटला. त्याने आता मी डाव्या हाताने होमवर्क करू शकणार नाही. वेबसाईट चेंज करू शकणार नाही. नेक्स्ट वीक मेनकाचा बर्थडे आहे. तिचा नवा प्रोफाईल अन इण्टर्व्ह्यू मला वेबसाईटवर टाकायचा होता. मी फॅनक्लब्सच्या वेबसाईट कॉम्पिटीशन मध्ये भाग घेणार होतो. आय वॉज सो एक्साइटेड अबाऊट ऑल धिस... अनटील वी हॅड दॅट फाईट .... इट्स ऑल ऋईन्ड"
समीर गप्पच होता. करणचे डॊळे पाणावले होते, "आय वॉज सो हॅप्पी दॅट आय वॉज गोईंग टू गिव धिस साईट ऍज अ गिप्ट टू मेनका. मला वाटलेलं मी कॉम्पिटीशन जिंकेन..."
अन एवढं बोलून खोली गप्प झाली. त्या शांततेत करणची हलकी स्फुंदके फक्त ऎकू येत होती.
"पण असं धीर सोडून कसं चालेल करण.", समीरनं खाली बघतच म्हटलं, "मला वाटतं यू कॅन स्टील विन इट!"
"ह्ह! हाऊ? ह्या तुटलेल्या हाताने?"
"मी मदत करीन.", समीरने आशेने करणकडे बघितलं, "आय मीन तू मला सांगशील तसं मी करेन."
करण नकारार्थी मान हलवत होता.
"प्लीज. एक चान्स दे फक्त! बघ मी तुझी वेबसाईट तयार होई पर्यंत ऑफिसला जाणार नाही. तुला हवं तेवढा वेळ मी कॉंप्युटर वर बसेन. तुला हवी तशी वेबसाईट बनवेन. फक्त एक चांस दे. भाऊ म्हणून. प्लीज! आय बेग यू."
करणने पाणावलेल्या डोळ्यांनी समीरकडे पाहिलं. समीरची विनंती धुडकावून लावावी असा विचार करणला क्षणभर चाटूनही गेला पण समीरच्या डोळ्यांत पश्चातापाची छटा दिसत होती. समीरचे डॊळेही पाणावलेले होते. करण काहीही बोलत नाही हे बघून समीरने करणच्या डाव्या खांद्यावर हात ठेवला अन तो आपुलकीने दाबला.
"सॉरी ब्रो!".. करण अजूनही अस्फुटसा स्फुंदत होता.
समीरने म्हटले..., "चकण्या ...ल्युटिनण्ट कमांडर देशपाण्डे!".
करण गप्प झाला. चार पाच सेकंदानी मग करणचा मंद आवाज आला, "चकण्या ... सडू ... ल्युटिनण्ट कमांडर देशपाण्डे."
समीरच्या चेहेऱ्यावर हास्य फुललं. त्याने "येस्स सर!", असं म्हणून करणला नेव्ही स्टाईल सल्यूट मारला अन एकदम दोघे हसायला लागले....
.... अचानक त्यादोघांत साचलेलं ते मळभ दूर झालं होतं अन करणची खोली हास्यानं उजळली होती.
********************************
भाग नऊ
"... आता हा कोड कॉपी कर आणि इथे पेस्ट कर.. मग ही यूआरएल इथे टाक. अरे तिथे नाही इथे... अं आत्ता ... इथे लिही ‘टाईमलेस मेनका’ ... टी कॅपिटल अन एम पण... ही इमेज इथे एंबेड्ड कर..."
कालपासून करणच्या गायडन्स खाली समीर मेनकाची साईट अपडेट करत होता. त्यासाठी समीरने ऑफिसला चार दिवस सुट़्टीही घेतली होती.
"आता इथे काय लिहायचं...", करण विचार करू लागला तसं समीरने चुकचुकत करणला करंगळी दाखवली. करणने भुवया उडवल्या... "आत्ताच जायचंय?"
"हो इट्स अर्जण्ट! १० मिनिट ब्रेक दे ना?"
करण थोडा हिरमुसून ओके म्हणाला. तसं समीरचा कॉम्युटरवर हात चांगला होता त्यामुळे हे काम वेळात होईल असं करणला मनातल्या मनात ठाऊक होतंच. ‘समीर! आणि मेनकाची साईट अपडेट करतोय?’ हा विचारच करणला मनातल्या मनात गुदगुल्या लावून जात होता. समीर गेला अन त्याच थोड्या वेळासाठी करण केलेल्या तयार झालेल्या वेबसाईटचा प्रिव्ह्यू बघू लागला.
अजून मेनकाची फिल्मफेयरची मुलाखत, तिचे एक्स्टर्नल लिंक्स, तिचा कव्हरपेज अन आर्टिकलमधले फोटो हे स्कॅन करून टाकायचं होतं. अजून दोन दिवसाचं काम बाकी होतं. पुन्हा मेनकाचा फ्लॅश स्लाईडशो आणि तिची क्विझ अपडेट करायची होती. मेनकाच बर्थडे म्हणजे २ सप्टेंबर. त्याच्या आधी एक दिवस साईट अपलोड करायची होती. हे टॅक्टीक्स करणने नीट विचार करून आखले होते. महिन्याच्या पहिल्या तारखेला नवं फिल्मफेयर बाजारात आलेलं असलं तरी त्यातले इण्टरह्यू अन फोटो कुठल्याही इतर फॅनसाईट्वर नसणार होते. करणचीच ही एकच अशी अद्ययावत साईट असणार होती. त्याच नाविन्याच्या आधारे बाकी फॅनसाईट्सपेक्षा आपल्यालाच हीट्स जास्त मिळतील अशी करणला आशा होयी. बॉलिवूडब्लॉग.कॉमच्या सर्व्हरवर अपलोड केल्यावर मग तो सर्व्हरच बेस्ट फॅनसाईट स्वतः मॉनिटर करणार होता. मग काय एकदा लोकांच्या पसंतीला उतरली की मोस्ट इन्हॉवेटीव्ह फॅनसाईटची ट्रोफी आपलीच! ह्या कल्पनेनी करण भारावून गेला होता.
समीर मात्र जितकं लवकर हे काम आटपेल तितकं बरं अशा आवेशात करणला मदत करत होता. मेनकाविषयी समीरचा द्वेष तसा तसूभरही कमी झालेला नव्हता. हे सारं तो फक्त करणच्या आनंदापायी करत होता. इकडे समीर नसताना करणचा मोबाईल वाजला अन वेबसाईटचा प्रिव्ह्यू बघत डाव्या हाताने काम करणाऱ्या करणने तो उचलला कसाबसा उचलला.
"हॅलो? करण?", समोरून कुणीतरी विचारलं.
"हॅलो", करणने हा आवाज ओळखला होता, "हाय पूजा. कशी आहेस?"
"मी ठिक. तू कसा आहेस?"
"मीही ठिक."
"सॉरी रे मी दोन दिवस भेटू शकले नाही तुला. खूप काम होतं घरी."
"नो प्रॉब्लेम.", करणने नेहेमीचे दोनच शब्द म्हटले.
"सॅवियोला मी तुझ्याबद्दल विचारलेलं काल. पण त्याने नीट उत्तर दिलंच नाही..."
सॅवियोवरून करणला आठवलं, त्याचं सॅवियोशी झालेलं भांडण, परवाचं. करणचं अंतःकरण पुन्हा जड झालं.
"... इज एवरीथींग फाईन?", पूजाने पुढे विचारले, "म्हणजे सॅवियो म्हणाला की तोही तुला दोन दिवस भेटला नाहीये... म्हणून विचारलं मी."
"नाही गं. काही प्रॉब्लेम नाहीये."
"... मग त्याने मला तुझी तब्येत का विचारायला सांगितली. स्ट्रेंज!", पूजाने पलिकडून प्रश्न केला. ते ऎकून करण गप्प बसला. सॅवियोने आपली पृच्छा केल्याचं करणला जाणवलं अन तो ओशाळला. इकडे दोन दिवस आपण सॅवियोची आठवणच काढली नाही म्हणून करणला स्वतःचाच राग येऊ लागला होता.
"इट्स ओके. सॅवियोला सांग आय एम फाईन म्हणून ", करण पूजाला म्हणाला. त्यावर पूजा म्हणाली, "तूच का त्याला सांगत नाही हे. एक मिनिट मागेच आहे तो. तुझ्या बाकीच्या ग्रुपमध्ये..."
"..नो वेट..", करणचं पूर्ण न ऎकताच पूजाने, "सॅवियो!", अशी हाक मारून, "करण वॉन्ट्स टू टॉक टू यू!", असं म्हणून फोन त्याच्याकडे दिला. शाळा सुटली होती कदाचित. पूजा अन सॅवियो दोघे परतीच्या मार्गावर असावेत.
सॅवियोचा मुळूमुळू आवाज पलिकडून आला
"हॅलो?"
"हाय!", करणने थोड्या जड आवाजात म्हटले.
"कसा आहेस?"
"मी बराय.", करणने थोडक्यात म्हटले अन तो गप्प बसला. सॅवियोही गप्पच होता.
‘अरे बोल ना पुढे...’, पूजा मागून प्रॉम्ट करत असावी.
"हॅलो!", सॅवियोचा आवाज आला पलिकडून, "आज मागल्या महिन्यात झालेल्या टेस्टचे पेपर्स मिळलेत. मॅथ्सचे."
"ओके"
"तुला आऊट ऑफ आहेत. पूजाला पण... मला ग्रेस मिळालेत."
"कॉन्ग्रॅट्स!", करण अनावधानाने बोलून गेला. एरवी करणला पूर्ण मार्क्स असूनही तोच सॅवियोला पास होण्याचं अभिनंदन नेहेमी प्रथम करत असे. आजचा दिवसही काही वेगळा नव्हता.
"थॅन्स!", सॅवियोने पलिकडून म्हटले. त्याने स्मित केल्याचं करणला कसंतरी फोनवरच कळलंच.
"सॅवियो!", करणचा आवाजही मुळूमुळू झाला, "यार सॉरी", सॅवियो गप्प होता, "उगीच भांडलो मी तुझ्याशी. आय ऍम सो स्टुपिड." करण पुढे म्हणाला.
सॅवियो थोडावेळ गप्पच होता. "येस यू आर स्टुपिड!", त्याने मंद अवाजात म्हटलं, "बट आय एम सुपरस्टुपिड. मला तर नीट सॉरी पण बोलता येत नाही.", सॅवियोने समोरून ओशाळत म्हटले.
"जाऊदे! मी बोललो ना सॉरी! आज संध्याकाळी भेटशील नं तेव्हा मला तू मला सॉरी बोल. नाहीतरी कितीतरी दिवसांचा होमवर्क बाकी असेल तुझा. मी हेल्प करायला नाहीये म्हटल्यावर.", करणने फोनवरच स्माईल दिली.
"हो! बाकी आहे. मॅथ्स, सायन्स, जिओग्राफी आणि मराठी. सगळे टेक्स्ट बुक्स घेऊन मी येतोय सहा वाजता. तयार रहा... सी यू!", सॅवियोने हसून पूजाला फोन दिला.
"काय मग? झालं मेल बॉण्डींग? बराच लवकर विरघळतोस तू? समीरदादाशीही रिजॉल्व्ह केलंस ना?", पूजाने करणचा पाय खेचला.
"म्हणजे? तुला कसं कळलं समीरदादा अन माझं भांडण सुटलं ते?", करणने चमकून विचारलं.
"मला आधीपासूनच ठाऊक होतं", पूजा दिमाखात म्हणाली, "सॅवियोला विचार. मी सांगितलेलं की करण जास्तीत जास्त चार पाच दिवस रागावेल. पण सॅवियो उगीच म्हणत होता बरंच सिरियस आहे. सेट व्हायला वेळ लागेल म्हणून. मग मी बेट़्ट लावली सॅवियोशी. एक मॅकबर्गर! ऍण्ड गेस्स व्हॉट कालच तुझ्या आईकडून कळलं की तुमचं पटलंय ते. जिंकले मी बेट़्ट! आणि काय रे? समीरदादाशी चार अन सॅवियोशी फक्त दोन दिवस ? छ्या! हे काय भांडण झालं? मुलींचं बघ. वर्षानुवर्षे एकमेकींशी बोलत नाहीत. शिवाय बिचींग करतात ते वेगळंच..."
करण हसला अन त्याने पूजाच्या बोलण्याला दुजोरा दिला. सॅवियो अन तिला शेवटचं बाय बोलून करणने फोन ठेवला. पूजाशि आता करणचं चांगलंच रुळलं होतं. हळूहळू करणच्या बेस्ट फ्रेण्ड्स्च्या यादीत सॅवियोच्या सोबतीस आता पूजाही सामील झाली होती असंच म्हणा ना. करण तिच्या कल्पनेनेच गालातल्या गालात हसत होता. त्यात त्याला समोर समीर येऊन बसल्याचे कळले पण नाही.
"हॅलो! शुकशुक. कसला विचार करतोस रामण्णा?", समीरने रेडियोजोक मारला.
"काही नाही."
"अं काही नाही? श्युर? तुझ्या चेहेऱ्यावर पूजाला बघितल्यासारखी लाली चढलीय.", समीरने एक भुवयी उंचावली.
"गेट लॉस्ट.", करण हुरळून म्हणाला, "उगीच बाता करू नकोस.", करणने कॉम्युटरस्क्रीनवर लक्ष केंद्रीत केलं, "चल काम पूर्ण करायचंय." असं म्हणून दोघांनी पुन्हा मेनकात तोंड घातलं...
... दुपार मेनकासाधनेत तशीच गेली.
संध्याकाळी सॅवियो अन पूजा आले होते. काहीतरी अर्जण्ट कामासाठी समीर ऑफिसात गेला होता. पण जाण्याधी आठवाजेपर्यंत येईन अन आज फ्लॅश स्लाईडशोचं काम पूर्ण करूच असं प्रॉमिस मात्र करणला द्यायला तो विसरला नाही.
सॅवियो अन पूजा करणला शाळेतल्या गमती सांगत होते.
"अरे करण! मी दिलेला आल्बम वापरून झाला का?", पूजाने काहीतरी आठवत टॉपिक मध्येच तोडत विचारलं.
"कुठला?"
"तोच रे गौतम अंकलनी दिलेला."
"ओह नो!", करणला अचानक काहीतरी आठवलं अन तो म्हणाला, "विसरलोच गं"
"ठिक आहे आल्बम काढ मग आता. मला प्रत्येक फोटोची हिस्ट्री अंकलकडून कळली आहे. सांगते मी तुला."
करणने आल्बम काढला. त्यात वीसेक फोटो असावेत.
"हा फोटो जेव्हा गौतम अंकल आणि मेनका ग्रॅजुएट झाले बडोद्यात. त्यांच्या कोन्वोकेशनचा."
करण मेनकाकडे बघत होता. मुसमुसलेल्या तारुण्याने भरलेली मेनका त्या साध्या पंजाबी ड्रेसमध्येही जणू पृथ्वीतलावरची अप्सराच वाटत होती. गौतम अंकल अन तिची जोडी खुलून दिसत होती.
"हा जेव्हा तिला इंटरकॉलेज कथ्थक कॉम्पिटीशनमध्ये फर्स्ट प्राईझ मिळालेलं तेव्हाचा.", करण हुरळला, ‘सो टॅलेण्टेड राईट फ्रॉम द कॉलेज डेज!’ ... आतापर्यंत चित्रपटात पाहिलेली, पूजाकडून कळलेली , मॅगझीनमध्ये वाचलेली मेनका ह्या साऱ्या फोटॊंत बरीच वेगळी वाटत होती. कसलीच चिंता नाही, दुःख नाही. सारं कसं मोकळं अन निरागस वाटत होतं. तिच्या जीवनातला हा विरोधाभास जाणवून करण थोडा अस्वथ झाला होताच पण ते जुने फोटो बघण्यातही एक समाधानही मिळत होतं त्याला. त्याने पुढचा फोटो उघडला. त्यात मेनका प्लास्टर मध्ये होती.
"ह्यात तिचा हात मोडलेला म्हणून सगळ्या फ्रेण्ड्स्नी तिला विशेस दिलेल्या...", पूजा असं म्हणाली तसं सॅवियो आणि पूजाने करणकडे मौजेने पाहिलं, "‘जसा बाप तसा बेटा’ च्या धर्तीवर आता ‘जसा स्टार तसा फॅन’ पण म्हणायला लागेल.", सॅवियोने मिश्किलीत म्हटले.
हसत हसत त्यानी पुढचं पान उलटलं. हा फोटो एकट्या मेनकाचा होता.
"हा तिच्या पहिल्या पिक्चरच्या लास्ट डे ऑफ शूटींगच्या दिवशी गौतम अंकलनी काढलेला. शी वॉज ऑन सम क्रूझशिप देन. नेक्स्ट फिल्मसाठी सगळं युनिट मलेशियाला जाणार होतं. त्याच क्रूझ ने."
"ह्म्म! ‘तूफान’चा दिसतोय.", करणने पहिला चित्रपट ओळखला, "कित्ती सुंदर दिसतेय इथे ती. इन अ सिंटिलेटिंग टील ड्रेस्स. जस्ट लाईक अ प्रिंसेस!"
पूजा शांत झाली, "हो!", अन उदास आवाजात म्हणाली, "ह्या दिवशी गौतम अंकलही बरेच खूष होते. त्यांनी ह्या फोटोनंतर तिला क्रूझवरच प्रपोझ केलेलं..."
"ओह! यू मिन .."
"येस! हाच तो दिवस. तिनं नाही म्हटलं अन अंकल मग खिन्न मनाने क्वालालंपूरला उतरून निघून गेले."
तिघे गप्प झाले. गौतम अंकलविषयी पुन्हा उमाळा दाटून आला होता.
"मी हा फोटो साईटवर टाकला तर चालेल", करणला त्यातली मेनका खूपच आवडून गेली होती.
"ओके! ऍज यू विश!"
पूजाने संमती दर्शवल्यावर करणने लगेच तो फोटो आलबम मधून काढून स्कॅन करून कॉम्प्युटरवर टाकलाही.
उरलेली संध्याकाळ मग बाकी फोटो बघण्यातच गेली. आणखी काही आवडलेल्या फोटोंच्या कॉपीज करणने बनवल्या अन जाण्याआधी पूजाला आल्बम परत करून थॅन्क्स म्हटले.
"यू आर नॉट वेलकम फॉर धिस ऍल्बम अटलीस्ट!"
"का?", करण गोंधळला...
पूजा हसून म्हणाली, "अरे गौतम अंकल उद्या जाणारेत पॅरिसला आणि नंतर न्यू-यॉर्क. मग पुन्हा हा ऍल्बम मिळणार नाही. म्हणून नेक्स्ट टाईम ह्या आलबमचं फेवर मागितलंस माझ्याकडे तर ‘यू आर नॉट वेल्कम’. गौतमंअकलनाच तूला विचारायला लागेल.", पूजाने डॊळे मिचकावले.
"ओके! पुन्हा नाही मागणार.", करणने पूजाला आश्वासन दिले, "ऍण्ड बाय द वे! गौतम अंकलना माझा बाय सांग. सांग की इट वॅज अ ग्रेट हेल्प!"
"श्युर!", मेनका म्हणाली, "निघते मी आता"
असं म्हणून पूजा अन सॅवियोने करणचा निरोप घेतला.
करण पुन्हा टाईमपासकरीत त्याच्या मेनकाप्रोजेक्टमध्ये घुसला.
कॉम्प्युटर वर पुन्हा पुन्हा तो टील ड्रेसमधला मेनकाचा फोटॊ बघत करण हरखून गेला होता. समीर येईपर्यंत बेसिक स्लाईड्शोचं टेम्प्लेट करून ठेवावं म्हणून त्याने फ्लॅश मध्ये हा अन इतर निवडक दहा फोटो जमवून ठेवले होते. आता फकत समीर यायचा अवकाश होता. वेबसाईट आपल्या मनासारखी बनतेय हे पाहून करण पुन्हा त्याच्या सप्तरंगी स्वप्नांत रंगून गेला नसता तर नवलच....
.... पण केवळ नियतीसच हे ठाऊक होते की हीच वेबसाईट पुढे करणच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांची नांदी ठरणार होती.
*****************************
भाग दहा.
"नंबर फिफ्टी सेवेन. करण रूपवते!", क्लासटीचर भट़्टचार्य मिसनी विचारलं अन "यस मॅम!" असा आवाज पलिकडून आला.
"ओह! करण यू आर प्रिझेन्ट टूडे?", मिसनी करणकडे स्मित देत पाहिलं, "हाऊ इज युअर हॅण्ड? लूक्स लाईक द प्लास्टर इज रीमूव्ड!"
"येस मॅम. इट वॉज टेकन ऑफ यस्टरडे." करण म्हणाला.
"ओके. गुड! वेलकम बॅक. नाऊ दॅट द प्लास्टर इज गॉन, टेक केयर विथ युअर हॅण्ड्स फॉर फ्यू डेज. सिट डाऊन ऍण्ड बी कंफर्टेबल."
करण बसला. हा एक आठवडा त्याने घरी कसाबसा घालवला होता. सतत शाळेची आठवण येत होती. आज करण शाळेत आल्याचा जास्त आनंद त्याच्या मित्रांना करणपेक्षा जास्त असावा. पूजा सॅवियो अन करण हे तिघे लेक्चर चालू असताना मागल्या बाकावर बसून बडबड करत होते. पूजाने सलोनी सिंगच्या शेवटच्या बाकावर करणच्या बेंचच्या लगतच आज जागा घेतलेली. सलोनीची मैत्रिण आस्था आज आली नव्हती.
भट़्टाचार्य मिस इंग्लिश शिकवत होत्या. मागे बसून बडबड करायला हाच तास परफेक्ट असे. कारण भट़्टाचार्य मिसना सोडावॉटरचा चश्मा होता आणि त्यांचे ऎकायचेही थोडे वांधे होते. त्यामुळे मागल्या बेंचला त्यांच्या लेक्चरच्या वेळी बराच भाव येई. मुलं एकमेकांना लाच देऊन जागा बदलत असत. करण अन सॅवियोने बॅकबेंचर दानिश अन कुंजन शाह ह्या क्लासमेट्स्ना आपल्या डब्यातला पुलाव राईस अन रोजकेक दिला होता. तिकडे पूजाने आपलं सायन्स जर्नल सलोनीला दिलं होतं.
"काय मग? झालं काम?", पूजाने दबक्या आवाजात विचारले.
"वेबसाईटच नं? हो. एकदम मस्त. कालच अपलोड केली.", करण म्हणाला.
"वॉव्व! आम्ही कधी बघू?", पूजा एक्साईट होऊन म्हणाली.
"अजून नाही. आज संध्याकाळी ते रिजल्ट डिल्केयर करतील. टॉप ३ वेबसाईट्सचा. तेव्हा बघा."
"ओके. श्युर. बाकी समीरदादा कसा आहे?", सॅवियोने विचारलं, "पुन्हा भांडला नाहीस ना त्याच्याशी?"
"नाही रे. फक्त काही दिवसांपूर्वी स्लाईडशो बनवताना मेनकाच्या फॊटॊंच्या सिलेक्शनच्या बाबतीत माझं अन त्याचं थोडं खट़्ट झालं होतं. अन शेवटी वेबसाईट बनवल्यावर तिचे क्रेडीट्स देताना पण त्याचं नाव मी टाकत होतो तर त्याने ‘नको नको’ केलं. "
"म्हणजे?"
"अरे मी तो मेनकाचा टील ड्रेस मधला फोटॊ घेतलेला न तुझ्याकडून. तो समीरला नव्हता आवडला. म्हणून त्याने थोडं कांकू केलं. पुन्हा त्याला ह्या साईटवर स्वतःचं नाव नकोय बिकॉज हि थिन्क्स हि वील गेट ऍंबॅरेस्ड अमंग हीज फ्रेण्ड्स ऍण्ड कलिग्स. सिल्ली!"
"ओके! त्याला तसं वाटतंय तर मग त्याचं नाव टाकू नकोस. पण तो मेनकाचा फोटो तर छान तर होता. समीरदादाला का आवडला नाही?"
"काय माहित. म्हणाला इतर फॊटॊंच्यासोबत तो बरोबर दिसत नाही. पण शेवटी माझंच वर्डीक्ट चाललं तिथे. मी तो फोटो वापरलाच."
"ओके. मग आता समीरदादाला सोडलयंस की नाही तुझ्या तुरूंगातून?", सॅवियोने डॊळे मिचकावत प्रश्न केला.
"पूर्ण पाच दिवस त्याला माझ्या रूममधून जाऊ दिलं नाही मी.", करण दिमाखात म्हणाला.
"बिचारा समीरदादा", पूजा म्हणाली.
"इट्स ओके नाऊ! तो माझ्या पाहाऱ्याखाली नाहीये. मी सोडल्यावर त्याने मित्रांसोबत पार्टी केली त्याच्या."
"याह ही मस्ट इंजॉय हीज लॉंंग अवेटेड फ्रीडम. बट ही मस्ट बी सो हॅप्पी!"
"तोच काय? आय ऍम हॅप्पी टू. केवळ माझी बेवसाईट बनलीय म्हणून नाही तर आज मेनकाचा बर्थडे पण आहे!!"
"काय? खरंच!", पूजाने चकित होऊन डेट चेक केली. आज २ सप्टेंबरचा दिवस होता.
"सही आहे. मेनकाच्या बर्थडेच्या दिवशी छान गिफ्ट दिलंस तिला. तिची नवी वेबसाईट. शी विल बी हॅप्पी.", सॅवियोने म्हटले.
करण हुरळला. मेनकाला आपल्या साईटविषयी कळलं तर किती बरं होईल असं त्याला वाटून गेलं. निदान त्या निमित्ताने ती थोडी आनंदित तरी होईल अशा विचारात करण वहीच्या शेवटच्या पानावर काळ्या निळ्या पेन्सनी मेनकाच्या नावाची ग्राफीटी काढू लागला.
भट़्टाचार्य आणि समान्था मिसचं इंग्लिश अन हिस्टरीचं लेक्चर संपलं अन मॅथ्सची सोलंकी मिस आली. करणच्या वहीचं मागलं पान एव्हाना मेनकाच्या नावांनी भरलं गेलं होतं. म्हणून करण त्याच्या आदल्या पानावर पेनानं अजून नवी ग्राफिटी आखत होता.
"सो करण! यू आर बॅक!", सोलंकी मिसने चश्मा ऍडजस्ट केला.
करण उभा राहिला, "येस मॅम"
"हाऊ आर यू फिलिंग?"
"फाईन मॅम"
"आय हर्ड यू वेयर फॉलॉईंग समवन ऑन युअर बाईक बिफोर यु क्रॅश्ड?"
ह्यावर सोलंकी मिसनं पूजाकडे पाहिलं. पूजा अन करण दोघे ओशाळले.
"नो मॅम. आय वॉज नॉट!"
"ओके! मे बी अ रूमर देन. आय वॉज सो क्युरियस...आय मिन वर्रीड!", सोलंकी मिसने शब्द बदलले, "बी केयरफूल नेक्स्ट टाईम. करण यू आर अ ब्राईट स्टूडण्ड. डॊण्ट ड्राईव्ह सो फास्ट. स्टॉप गेटींग सो इन्फ्ल्युएण्स्ड बाय युअर फ्रेण्ड्स!"
अन असं म्हणून तिनं एक थंड नजर सॅवियोवर फिरवली अन करणला बसायला सांगितलं.
सॅवियोने आ वासला होता.
"शी मिन्स की माझ्यामुळे तू तुझी बाईक फास्ट चालवत होतास?"
"मे बी", करण अजूनही त्याच्या अन पूजाच्या किश्श्यामुळे ओशाळला होता.
"मला वाटलेलं की सोलंकी मिस माझ्याशी चांगलं वागायला लागलीय. बट शी इज सच अ हिप्पोक्रीट.", सॅवियो जळजळीत भाषेत म्हणाला, "व्हॉट अ काऊ!"
असं म्हणून सॅवियोचं रागात सोलंकी कार्टून काढणं सुरू झालं. आता त्या मागल्या बेन्चवर ते दोघे वहीचं मागलं पान आपापल्या पेनानी कोरत होते.
आजचा शालेय दिवस त्यातच संपला.
"करण करण!", शाळा सुटली तसं मागून दानिश शहा हाका मारत गर्दी कापत करणच्या समोर येऊन ठेपला.
"हाय दानिश!", करणने म्हटले. एव्हाना करण, पूजा अन सॅवियोला दानिशचं इथे येण्याचं प्रयोजन कळलं होतं.
"करण मी.."
"दानिश, आय ऍम सो सॉर्री! मी तुझा होमवर्क देऊ शकलो नाही..", करणच पुढाकार घेऊन म्हणाला, "अरे डाव्या हाताने होमवर्क लिहिता येत नाहीय. पण बरा होईन तेव्हा मी नक्कीच तुला फ्री होमवर्क देईन..."
दानिशच्या चेहेऱ्यावर गोंधळल्याचे भाव होते. त्याने थोडक्यात पूजाकडे पाहिलं. पूजाने भुवयांनी कुठलीतरी रिक्वेस्ट केली.
दानिश दोन सेकंद गप्प झाला. थोडं थांबून म्हणाला, "नाही नाही तसं काहीच नाहिये. मी होमवर्कचं विचारायला आलोच नव्हतो. मी तुला तुझ्या हेल्थ विषयी विचारलंच नाही न एवढे दिवस. फोन पण नाही केला. म्हणून माफी मागायला आलो होतो."
पूजाने कुठलातरी सुटकेचा निश्वास टाकाला. सॅवियोनेही दम घेतला. करण गोंधळला होता.
"म्हणजे तुला फ्री होमवर्क नकोय?", करणने गोंधळून विचारले.
"नाही. तू ठेव ते मॅगझीन." असं म्हणून दानिश निघून गेला.
किती तरी वेळ करण दानिशच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच चकित होऊन पाहत होता.
"डीड यू सी दॅट?", त्याने पूजा अन सॅवियोकडे पाहिलं, "दानिशने फ्री होमवर्क घेतला नाही माझ्याकडून!".
तो दोघांकडे बघू लागला तसे दोघे काही न घडल्यासारखे वागू लागले.
"काय झालं? तुम्ही असे का वागताय? आर य़ू ओके.", करणने भुवया आकुंचल्या.
"वी आर फाईन. लेट्स गो होम. ऊशीर झालय.", पूजाने करणचा पुढचा प्रश्न गुंडाळत म्हटले.
दानिशला फ्री होमवर्क आधीच आपल्याकडून मिळालाय हे करणला समजले असते तर तो पुन्हा आपल्याशी रुसून किंवा भांडण करून बसला असता, हे पूजाने जाणले होते. सॅवियोनेही पूजाला होमवर्कमध्ये मदत केली होती. त्यामुळे दोघांनी करणला टाळत कशीबशी वेळ मारून नेली आणि तिघे आपापल्या घरी पोहोचले.
घरी बेल वाजवली तसं आईने दरवाजा उघडला. समीर आज लवकर ऑफिसातून आला होता. दिवाणखान्यात बसून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. आईचे डॊळे मलूल होते.
"काय झालं आई?", करणने घरातला बदलेला मूड ओळखला.
आईने एक धक्कादायक माहिती पुरवली, "मनोहरमामांना अपघात झालाय... मुंबई-पुणे हायवेवर. हॉस्पिटलात नेलंय कान्हेफाट्याच्या"
"ओह माय गॉड! मग अजून काही कळलं?", करण चिंतीत झाला.
"काहीच नाही. आम्हाला कळतंच नाहीये...", आईने असं म्हणून डॊळ्यांना पदर लावला.
करणने गुपचुप जाऊन बॅग खोलीत ठेवली अन दिवाणखान्यात पुढची खबरबात काय कळतेय हे पाहण्यासाठी तो समीरच्या बाजूस येऊन बसला. फोनवर पलिकडे कुसुममामी होती. तिचा हडबडलेला आवाज समीरच्या मोबाईलवरून आई अन करण दोघांना स्पष्ट ऎकू येत होता. समीरने मामीला कसंबसं सांभाळत समजावत फोन ठेवला.
‘काय झालं? मामा कसा आहे? मामीचं काय?’, करण अन आईच्या चेहेऱ्यावर हजारेक प्रश्न साफ दिसत होते.
"मला जायला लागेल. मामी एकटीच आहे. मामाची कंडीशन क्रिटीकल आहे.", समीर अत्यंत गंभीर झाला होता.
आईला रडू कोसळलं. मनोहर मामा आईचे चुलत असले तरी एकटेच जवळचे नातलग होते.
"अरे पण कुसुमच्या सोबत कुणीतरी बाईमाणूस हवं ना... मी ही आले असते.. पण करणचा हात...", आई सैरभैर झाली होती.
समीर आईला समजावत म्हणाला, "मी करेन ना हॅण्डल. तुला काहीही काळजी करायची गरज नाहीये. आई खरंच."
पण आई ऎकत नव्हती. दोन तीन चार असे किती दिवस पुण्याला राहायला लागेल हेही माहित नव्हतं.
करणनेच मग स्वतःच सूचित केलं, "तुम्ही माझी काळजी करू नका. मी सॅवियोबरोबर राहीन. तो येईल इकडे माझ्यासोबत रात्री. जेवणाचं काय हॉटेलातून मागवेन."
"नको रे तुला एकटं... तुझा हात..", आई म्हणाली तसं करणने तिला मध्येच तोडलं, "आई खरंच. मी ठिक आहे. बघ आज शाळेत पण जाऊन आलोच ना. सॅवियो आहे. त्याचे मम्मी पप्पा आहेत. मी मॅनेज करेन. समीरदादा तूच सांग न आईला."
समीरलाही काय करावे कळत नव्हते. पण अशा अवस्थेत आईचं मन इथे लागलंच नसतं. नस्त्या शंका कुशंकानी तिचा जीव बेजार झाला असता. तिकडे कुसुममामीला आई असेल तर बरे वाटेल म्हणून तिला नेणं समीरला जास्त संयुक्तिक वाटत होतं.
बराच वेळ समजावल्यावर समीरच्या सांगण्यावरून मग आई तयार झाली.
दुपारी तीनपर्यंत समीर अन आई पुण्याला निघाले. तरी जाता जाता आईने करणला नीट राहण्याच्या शंभरेक सूचना दिल्या असतीलच. सॅवियोच्या आई वडिलांशीही तिचं तीनदा बोलणं झालं होतं. त्यांनी करणच्या टीफिन अन जेवण्याची स्वतःच सोय केली होती. म्हणून आईचा जीव थोडा भांड्यात पडला होता.
करणने त्यांना बाय केलं. रात्रीचं जेवण घेऊन सॅवियो आला होता. त्याची रात्रीची झोपायची व्यवस्था करणकडेच होती. मनोहरमामा करणचे एकमेव मामा होते त्यामुळे करणलाही काळजी लागून राहिली होतीच. समीरच्या फोनची वाट पाआत करण कसाबसा वेळ घालवत होता...
"काय कळली तुझ्या मामाची तब्येत?", सॅवियोने करणला विचारलं.
"अजून फोन नाही आला. दोन तासांपूर्वी एक्सप्रेस हायवेला गाडी लागली होती. काही वेळात पोहोचतीलच.", करणने टि.व्ही. चॅनल सर्फ करत म्हटले. त्याची काळजी त्याच्या सततच्या हलणाऱ्या तळपायांनी साफ दिसत होती.
"ओके." सॅवियोने मोजकेच शब्द बोलून संभाषण संपवलं.
टिव्हीवर कुठल्यातरी चॅनलवर मेनकाची बर्थडेची न्यूज फ्लॅश होत होती ती पाहताच करणला आठवली. आजची कॉंपिटीशन.
"अरे मी विसरलोच. आजची कॉम्पिटीशन!", करण ताडकरून उठला अन बेडरूमध्ये पळाला.
सॅवियोही त्याच्या मागोमाग गेला, "काय झालं?"
"अरे आजचा वेबसाईट कॉम्पिटीशनचा रीजल्ट...", असं म्हणून करणने इण्टरनेट चालू केले अन बॉलिवूडब्लॉग्स.कॉम वर लॉगिन केलं. वेबसाईट लोड व्हायला वेळ घेत होती.
"इण्टरनेट स्लो आहे.", सॅवियो पाच मिनिटं वाट बघून कंटाळून म्हणाला.
"आज भरपूर हिट्स मिळाल्या असतील म्हणून सर्वर वर लोड आला असेल.", करणनं प्रॉब्लेमचं विश्लेषण केलं.
सहा सात मिनिटांची साधना शेवटी फळीस मिळाली.
मेनक-द-ड्रीमगल.कॉम पहिल्या तीन विनर्सच्या लिंक मध्ये दुसरी आलेली होती!
पहिली अनुजकुमार.नेट अन तिसरी मालविका-द-डॉल.कॉम दिसत होती.
"यिप्पी!", करणने आनंदात टाळ्या पिटल्या. सॅवियोही हर्षभरीत झाला होता, मालविकाची साईटही जिंकली होती म्हणून थोडा जास्तच.
"कॉन्ग्रॅट्स! नाईस जॉब!", सॅवियोने करणला लाडात पंच मारला तसं करणला दुखलं. "उप्प्स! सॉरी!", सॅवियोने हात उडवले.
पण करणला कसलीही दुखण्या बिखण्याची फिकर नव्हती. त्याची एवढ्या दिवसांची मेहेनत सफल झाली होती. मोडलेल्या हाताने का होईना पण केवळ समीर दादा च्या मदतीने अन स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हा मेनकाच्या फॅनशिपमधला मैलाचा दगड करणने पार केला होता.
बॉलिवूडब्लॉग्स.कॉमने विनर्सना एक एक्सबॉक्स ३६० अन एक सरप्राईझ गिफ्ट अनाऊन्स केलं होतं. सरप्राईज गिफ्टची अनाऊण्समेण्ट करणच्या ईमेल वर लवकरच होणार होती. तोवर एक्स्बॉक्सवर समाधान मानायचं होतं.
"न्यू एक्सबॉक्स ३६०! सही आहे! म्हणजे आता आपण टिव्हीच्या बिग स्क्रीनवर एनेफेस कार्बन खेळू...", सॅवियो उत्साहाच्या भरात अनपेक्षितपणे म्हणाला, "म्हणजे तुला खेळायला कुणी नसेल तर मी येत जाईन. कधीही...", त्याने आपला बाज झटकन बदलला. उगीच डेस्परेट वाटायला नको म्हणून.
पण करणला कुठल्याही गिफ्टपेक्षा आपली अचिव्हमेण्ट जास्त मौलाची वाटत होती. तो त्यानेच हुरळला होता. त्याच उत्साहाच्या भरात त्याने आपली मेनका ड्रीमगल साईट उघडली. साईटवरचा ब्लॉग विझीटर कमेन्ट्सनी भरून वाहत होता. एका दिवसात ३० हजार हिट्स. हा तर नवा रेकॉर्ड होता! करणने काही मोजके मेसेजेस उघडले अन तो वाचू लागला...
मेनकाचे फॅन्स तिची ही अद्ययावत साईट बघून हरखून गेले होते. कुणाला मेनकाची फिल्मफेयरची मुलाखत आवडली होती. कुणाला तिचं फ्रण्टकव्हर. कुणाला तिची क्विझ पटली होती तर कुणाला तिचे नवे फोटॊ. जवळजवळ साऱ्यांनाच फ्लॅश प्रेझेन्टेशन आवडलं होतं. तिचा टील ड्रेस फिमेल फॅन्समध्ये फेमस झाला होता. साऱ्या मुलींनी (ज्या नावाने मुलींसारख्या भासत होत्या त्या सगळ्यांनी) त्या ड्रेसविषयी पृच्छा केली होती. करण हुरळून त्या फोटॊच्या बाबतीत ‘समीर किती चूक होता’ ह्याचंच मापन किती तरी वेळ करीत होता. त्याच उल्हासाच्या भरात त्याने मेसेजबोर्डवरचं चौथं पाचवं पान उघडलं अन त्या पेजवर त्याला एक अनपेक्षित नाव दिसलं....
ब्लॅकवल्चर!
खाली मेसेज होता ... "मेनकाच्या जीवनातील आणखी एक मैलाचा दगड. ही तिची वेबसाइट ... एवढे फॅन्स अन गमावलेलं यूटेरस! ही साईट बघून वांझोटीला तेवढाच दिलासा तरी मिळेल ..."
करणला धक्का लागला होता. त्याचा मनातला आनंद क्षणात रागात बदलला, ‘हाऊ डेयर ही? मेनका, गौतम अंकल, मी आणि पूजा आपल्या चौघांत असलेलं हे गुपित ब्लॅकेवल्चरला कसं काय ठाऊक?’, त्याला रागात काहीच कळेनासं झालं. बाजूला बसलेला सॅवियोही ते मेसेजेस वाचत होता म्हणून करणने प्रसंगावधान राखून साईट मिनिमाईज केली.
"सॅवियो कॅन यू डु मी अ फेवर? आज थंडी वाटतेय थोडी. तू समीरदादाच्या बेडरूममध्ये माळ्यावर असलेली रजई आणून देशील. मला एका हाताने काढता येणार नाही. प्लीज."
सॅवियोने तो मेसेज वाचला नसावा कारण तो कसलेही आढेवेढे न घेता पटकन "ओके" म्हणून समीरच्या खोलीत निघून गेला.
इकडे सॅवियोच्या नकळत करणने वेबसाईट ऍडमिन म्हणून ब्लॅकवल्चरचा मेसेज डीलीट केला. डीलीट करण्याधी मात्र ब्लॅकवल्चरचा ईमेल सेव्ह करायला तो विसरला नाही. ह्या ब्लॅकवल्चरचा पाठपुरावा आता करायलाच हवा होता. ह्या ब्लॅकवल्चरमुळे पुन्हा एकदा करणच्या उत्साहाला गालबोट लागलं होतं.
"हा ब्लॅकवल्चर कोण आहे? ह्याला का मेनकाशी एवढा खुन्नस आहे? खरंच तो मेनकाचा मुलगा तर नाही? ... नाही... तसं नसणार. नाहीतर गौतम अंकलना काही तरी आयडीया आली असतीच. ते मेनकाला आधीपासून ओळखतात... शिवाय मेनकाचा कॅन्सर... तिला तर मूल कधीच होऊ शकणार नाही... म्हणजे हा नक्कीच कुणीतरी ब्लॅकमेलर किंवा स्पॅमर असावा... बट ही नोज सो मेनी थिंग्स अबाऊट मेनका... हाउ कॅन ही...", करणच्या मनात भावभावनांचा वृत्तविचारांचा कल्लॊळ माजला होता.
करणच्या पायांची हालचाल वेगावली होती.
रजईसकट परतलेल्या सॅवियोने करण नर्व्हस झाल्याचं ओळखलं.
"काय झालं यार? एवढा कसला विचार करतोयस..."
करण हडबडला, "अं! हं! काहीच नाही... असंच... अजून आई समीरचा फोन आला नाही म्हणून..."
अन तेवढ्यातच फोनची रींग वाजली.
हा समीरच होता.
"काय झालं?", करणने अधीरतेने विचारलं, "मनोहर मामा..", करणने वाक्य पूर्ण करायच्या आधीच समीर उदार स्वरात म्हणाला, "मामा आयसीयू मध्ये आहेत. कंडिशन क्रिटिकल आहे. डोक्याला मार लागलाय.... ", समीर थांबला तसा मागे आईचे अन कुसुममामीचे हुंदके ऎकू येत होते, "रात्र वैराची आहे. ही रात्र तेवढी निघाली तर स्कोप आहे..."
आज चांगल्या बातम्यांपेक्षा वाईट बातम्यांचं जणू पेव फुटलं होतं. करणने दुःखी मनाने फोन खाली ठेवला. ह्या कौटुंबिक दुःप्रसंगात आपण जिंकलेली ही आजची कॉम्पिटीशन करणला थोटकी वाटू लागली होती...
... ह्या नव्या बातमीमुळे त्याच्या आजच्या आनंदावर आता पूर्णपणे विरजण पडलं होतं...
*********************
Contd...

Subscribe to:
Posts (Atom)